Fact Check: आईसक्रीम आणि इतर थंड पदार्थांच्या सेवनाने कोविड 19 चा प्रसार होतो? PIB ने सांगितले मेसेज मागील सत्य

PIB ने याची पडताळणी केली असून यामागील सत्य सांगितले आहे.

Eating ice creams Can Spread COVID-19 is FAKE (Photo Credits: Pxhere)

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात आपली दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे पसरणाऱ्या अफवांचे प्रमाणही वाढत आहे. यापू्रवी अनेक खोटे मेसेजस, माहिती समोर आली होती. आता फ्रोजन फूड आणि आईसक्रीम खाल्याने कोरोनाचा प्रसार होतो असा दावा केला जात आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर फिरत असून त्यात थंड पदार्थ आणि आईसक्रीम खाल्याने कोरोनाचा संसर्ग होतो असे म्हटले आहे. पीआयबी ने या व्हायरल मेसेज मागील सत्यता तपासली असून हा दावा खोटा असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

पीआयबीने ट्विट मध्ये म्हटलं आहे की, "फ्रोझन अन्नपदार्थ आणि आईसक्रीम खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होत नसल्याचे यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दाव्याला कोणतेही शास्त्रीय आधार नाही." म्हणजेच ही माहिती खोटी आहे हे स्पष्ट होते. (10 सेकंद श्वास रोखून धरणाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होत नाही? काय आहे या व्हायरल मेसेज मागील सत्य?)

PIB in Maharashtra Tweet:

भारतात कोरोनाचा प्रभाव दिवसागणित वाढत आहे. आजही भारतात 1718 नव्या रुग्णांची भर पडली असून देशातील कोरोना बाधितांचा आकडा 33050 वर पोहचला आहे. त्यापैकी 8325 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 23651 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तसंच आतापर्यंत 1074 कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.