Rainbow & Sparrow: रगं बदलणारी 'सप्तरंगी' चिमणी, जणू आभाळातले इंद्रधनुष्य; पाहा व्हायरल व्हिडिओ

पण, सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक गुंजन पक्षी (Hummingbirds) दिसतो. हा पक्षी इतके रंग बदलतो की, आभाळातील इंद्रधनुष्य (Rainbow) आठवावे. आपण इथे या पक्षाचा व्हिडिओही पाहू शकता.

Rainbow & Hummingbird | | (Photo Credit - Twitter)

Hummingbirds Like Rainbow: रंग बदलणारे राजकारणी ही जमात मानवप्राण्यात आपण पाहतो. पण रंग बदलणे ही संकल्पना आपण मानवासाठी केवळ शब्दार्थ या अर्थाने वापरतो. पण 'रंग बदलणे' याचा शब्दश: अर्थ आणि अनुभूती घ्यायची तर आपल्याला निसर्गात जायला हवे. निसर्गातही आपल्याला रंग बदलणारा गिरगीट (Chameleons) किंवा फरुड हाच प्राणी आपल्याला माहिती असतो. पण, सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक गुंजन पक्षी (Hummingbirds) दिसतो. हा पक्षी इतके रंग बदलतो की, आभाळातील इंद्रधनुष्य (Rainbow) आठवावे. आपण इथे या पक्षाचा व्हिडिओही पाहू शकता.

गिरगिट जसे आपले रंग बदलतो तशीच हा पक्षीही अवघ्या काही क्षणात आपल्या पंखाचे रंग बदलताना दिसतो. या पक्षाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जो पाहून कदाचित आपणही आश्चर्यचकित व्हाल. अवघ्या काही क्षणात ही चिमणी इतके रंग बदलते की ज्यात आपल्याला जणू निसर्गाचेच रंग दिसतात. (हेही वाचा, World Sparrow Day: जागतिक चिमणी दिनानिमित्त जाणून घ्या या पक्ष्यांच्या संवर्धनासंबंधी महत्त्वाची माहिती)

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2.8 मिलियन पेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओखाली नेटीझन्स अनेक मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आतापर्यंत निसर्गातील इतकी सुंदर बाब मी पाहिलीच नव्हती. आणखी एक युजर्सम म्हणतो 'OMG' खूपच सुंदर. एक युजर्स म्हणतो इतके सगळे रंग पाहून पक्षी खुश झाला असेल. (हेही वाचा, Hunting & Hunter Viral Video: चिमणीने घेतला बदला, शिकारी स्वत:शिकार झाला; लोक म्हणाले जागेवर न्याय झाला, पाहा व्हिडिओ)

ट्विट

हमिंगबर्ड या पक्षाला गुंजन पक्षी म्हणूनही ओळखळे जाते. हा पक्षी आपल्या आवाजाने एक प्रकारचा विशिष्ट आवाज काढतो. त्यामुळे त्याला गुंजन पक्षी म्हटले जाते. त्याची लांबी सरासरी 7.5–13 सेन्टीमीटर इतकी असते. काही पक्षी ५ सेमी आणि वजन २.५ ग्राम इतकाही असू शकतो. हा पक्षी सर्वात मोठा असेल तर त्याची सरासरी लांबी 23 सेमी लांब असते. जिचा भार 18 ते 24 ग्रॅम च्या आसापास असते.

हा पक्षी प्रामुख्याने अमेरिकेत आढळतो. याच्या साधारण 360 प्रजाती आढळतात. या पक्षाला फूलांचे अमृत (Nectar) प्यायला आवडते. हा पक्षी कीटक आणि किडेही खात असतो. जेव्हा हा आपले पंख फडफडवतो तेव्हा तो अधिक सुंदर आणि तितकाच रंगीबेरंगी दिसतो. याला 10 पंख असतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif