Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात; ट्रकने मागून कारला दिली जोरदार धडक, तीन व्यक्ती जागीच ठार, पहा थरारक Video

या चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरात सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात मरण पावले आहेत.

Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात; ट्रकने मागून कारला दिली जोरदार धडक, तीन व्यक्ती जागीच ठार, पहा थरारक Video
Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai-Pune Expressway) याआधी अनेक अपघाताच्या (Accident) घटना घडल्या आहेत. वेळोवेळी सूचना करूनही, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार चालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत व यामुळेच मोठ मोठे अपघात घडतात. आताही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. 1 जुलै रोजी अनियंत्रित कंटेनर ट्रक आणि आय 10 कार दरम्यान हा अपघात घडला असून, यामध्ये कारमधील तीनही व्यक्ती जागीच ठार झाल्या आहेत. ओव्हरटेक करत असलेल्या कारला मागून कंटेनरने जोरात धडक दिली, यामुळे कारचा पूर्णपणे चुरा झाला.

या अपघाताची आणि मृत्यूची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोकीम (36), त्यांची पत्नी लुइझा (35) आणि मुलगा जाझियल (4) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब पुण्यावरून वसईजवळील नायगाव येथे आपल्या घरी परतत होते. रायगड जिल्ह्यातील बोरघाट येथे हा अपघात झाला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईकडे जात असताना जोकीम आपल्या गाडीसमोरील एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत आहे व इतक्यात मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो. त्यानंतर त्याची मागून जोकीमच्या गाडीला धडक बसते व तो पुढे येऊन पलटतो. या अपघातावेळी जोकीमची गाडी दोन ट्रकच्या मध्ये असल्याने या गाडीचा पूर्णतः चुराडा झाला आहे. नंतर या गाडीने पेटही घेतला. या अपघातात ट्रक चालक रमेश निकम याला गंभीर दुखापत झाली असून त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा: Monkey Viral Video: माकडांची उंच इमारतीवरुन घसरगुंडी, पहा व्हायरल व्हिडिओ)

या चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरात सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात मरण पावले आहेत. टीओआयच्या अहवालानुसार जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 66 अपघात नोंदविण्यात आले. अहवालानुसार या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला तर 39 गंभीर जखमी झाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2021 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).