Holiday Season च्या शुभेच्छा देत गूगलने यंदा नाताळच्या दिवशी शेअर केलं खास डूडल!

यंदा गूगलदेखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले आहे. युजर्सना गूगलने डूडलच्या माध्यमातून यंदा Holiday Season च्या शुभेच्छा देत नाताळ म्हणजेच ख्रिसमसचा सण स्पेशल केला आहे

Happy Holidays 2019 Google Doodle | Photo Credits: Google.com

Happy Holidays 2019 Google Doodle: जगभरात 25 डिसेंबर हा दिवस प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा गूगलदेखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले आहे. युजर्सना गूगलने डूडलच्या माध्यमातून यंदा Holiday Season च्या शुभेच्छा देत नाताळ म्हणजेच ख्रिसमसचा सण स्पेशल केला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ते जानेवारी म्हणजे नववर्षाचा पहिला आठवडा हा 'हॉलिडे सीझन' म्हणून ओळखला जातो. यामध्ये ख्रिस्ती बांधवांसोबतच इतर समाजातील लोकं देखील मोठ्या उत्साहाने सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतात. चर्चप्रमाणेच ख्रिस्ती बांधव त्यांच्या घरांमध्येही आकर्षक रोषणाई करून या हॉलिडे सीझनचा आनंद लूटतात. Happy Christmas 2019 Messages: ख्रिसमस शुभेच्छा संदेश, मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा नाताळ सणाचा आनंद!

प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नेमका कधी असतो याबाबतच्या तारखेबाबत नेमकी शाश्वती नाही. मात्र 24 डिसेंबरच्या रात्री ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. हा दिवस ख्रिसमस ईव्ह असतो. त्यानंतर 25 डिसेंबर दिवशी ख्रिसमस म्हणजेच नाताळ साजरा केला जातो. तर 26 डिसेंबरच्या दिवशी बॉक्सिंग डे साजरा करण्याची प्रथा आहे. जगभरातील सुमारे 160 देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो.

ख्रिसमसचं रंगबेरंगी सेलिब्रेशन, चॉकलेट्स, केक यासोबत असणारं विशेष आकर्षण म्हणजे 'सॅन्टाक्लॉज'. देवदूताच्या रूपात येणारा सॅन्टा आबालवृद्धांना आनंद, गिफ्ट्स घेऊन येतो अशी धारणा असल्याने प्रामुख्याने चिमुकल्यांमध्ये त्याच्याविषयी विशेष आकर्षण असतं. यंदा ख्रिसमस नंतर 2020 या नववर्षाची सुरूवात होणार आहे.