Street Children To Dinner At 5-Star Hotel: रस्त्यांवरील मुलांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये मेजवानी (Watch Video)
अशाच काही मुलांना ही संधी मिळाली आहे. @kawalchhabra या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ (Viral Video) आणि त्यावरील पोस्टनुसार या मुलांना एका व्यक्तीने चक्क पंचतारांकीत हॉटेलमध्ये मेजवाणी दिली आहे.
Trending News: सामाजिक आर्थिक दरी हा नेहमीच चिंतेचा विषय आहे. एका बाजूला उभी राहणारी पंचतारांकीत हॉटेल्स (5-Star Hotel), उच्चभ्रू इमारती आणि मॉल्स दुसऱ्या बाजूला दोन वेळच्या अन्नालाही मोताद असणाऱ्या झोपडपट्ट्या. ही असमानता विचारी माणसांच्या अंगावर येणारी असते. अशा वेळी रस्त्यांवरच्या फाटक्या माणसालाही कधीतरी असे वाटू शकते की, मलाही पंचतारांकीत हॉटेल्समध्ये कधीतरी जेवण करायला मिळावे. अशाच काही मुलांना ही संधी मिळाली आहे. @kawalchhabra या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ (Viral Video) आणि त्यावरील पोस्टनुसार या मुलांना एका व्यक्तीने चक्क पंचतारांकीत हॉटेलमध्ये मेजवाणी दिली आहे.
रस्त्यावर साफसफाई करणार्या मुलांना भेटलेल्या त्या माणसाने त्यांच्या आकांक्षांबद्दल विचारपूस केली. त्यांनी पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्याने मुलांच्या गटाला 5-स्टार हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने पिझ्झा, गोलगप्पा, कुरकुरीत स्नॅक्स आणि मुख्य कोर्स ऑफरसह अनेक प्रकारच्या डिशसह भव्य बुफेचा आनंद घेतला. व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते की, हा व्यक्ती त्या मुलांशी आनंद वाटून घेताना दिसतो आहे. (हेही वाचा, Viral Dance Video: मुंबईत स्टेशनवर मुलीचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, Watch Video)
इन्स्टाग्रामवर @kawalchhabra या हँडलवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 39 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. इन्स्टाग्रामवरील अनेकांनी या व्यक्तीचे कौतुक केले आहे. अनेकांनी त्याच्या या कृतीचे वर्णन अनपेक्षित आणि हृदयस्पर्शी क्षण म्हणून केले आहे.
पंचतारांकीत हॉटेल म्हणजे काय?
पंचतारांकित हॉटेल्स ही अशी मालमत्ता आहे जी त्यांच्या अतिथींना वैयक्तिकृत सेवा, सुविधांची विस्तृत श्रेणी आणि अत्याधुनिक निवास याद्वारे सर्वोच्च स्तरावरील लक्झरी देतात. हॉटेल्ससाठी कोणतीही मानक रेटिंग प्रणाली नसली तरीही, हॉटेल्स पाहुण्यांना अनुभव प्रदान करून 5-स्टार फरक मिळवतात. जे आराम, सजावट आणि लक्झरीच्या सर्वोच्च अपेक्षा पूर्ण करतात किंवा त्याहून अधिक असतात. पंचतारांकित हॉटेलचे कर्मचारी विनम्र, चौकस, विवेकी आणि पाहुण्यांच्या गरजांचा अंदाज घेऊ शकतात.
व्हिडिओ
सामान्य नागरिकांमध्ये पंचतारांकीत हॉटेलचे मोठे आकर्षण असते. आलिकडे शिक्षण, पैसा आणि एकूणच श्रीमंती वाढल्याने नागरिकांमध्ये बऱ्यापैकी जागृती आली आहे. त्यामुळे पंचतारांकीत हॉटेलमधील सेवा आणि तिथे जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. असे असले तरी अजूनही सर्वसामान्य नागरिकांमध्ये या हॉटेल्सचे आकर्षण कायम असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे या रस्त्यावरील मुलांना मिळालेली ही मेजवाणी अनेकांनी कौतुकाचा क्षण म्हणून उल्लेखली आहे. ज्याचे पर्यावसन आपल्याला व्हिडिओच्या प्रिक्रियांमध्येही पाहायाल मिळते.