सिंहाचं ही कनवाळू रूप; पहा बदकाच्या पिल्लासोबत खेळणार्या जंगलाचा राजाचा हृद्यस्पर्शी व्हिडिओ
णवठ्याच्या शेजारून जाणार्या सिंहाने पाण्यात बदकाचं पिल्लू पाहून त्याला काही वेळ गोंजारल्याचा हृद्यस्पर्शी व्हिडीओ सध्या अनेकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
सिंह हा जंगलाचा राजा आहे त्यामुळे त्याचा दरारा जंगलातील सार्याच प्राण्यांना असतो. भव्य शरिर, आयाळामधील चेहरा, त्याची डरकाळी ऐकून अनेकांना सिंहाला पाहून भीतीच वाटत असेल पण सध्या सोशल मीडीयामध्ये एरवी दरारा, रूबाबदार अंदाजामध्ये फिरणार्या सिंहाचं कणवाळू रूप पहायला मिळालं आहे. IFS,Susanta Nanda यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंट वरून सिंहाचा शेअर केलेला व्हिडीओ सध्या नेटकर्यांचे लक्ष वेधून घेतलं जात आहे. यामध्ये पाणवठ्याच्या शेजारून जाणार्या सिंहाने पाण्यात बदकाचं पिल्लू पाहून त्याला काही वेळ गोंजारल्याचा हृद्यस्पर्शी व्हिडीओ सध्या अनेकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. जंगलाचा राजा 'सिंह' जेव्हा गुजरातच्या जूनागढ मध्ये हॉटेलच्या परिसरात आला... पहा या थरारक क्षणाचा व्हिडिओ (Watch Video).
IFS,Susanta Nanda यांनी या व्हिडिओसोबत खास कॅप्शन देखील दिले आहे. 'मांसाहारी असलेला हा महाकाय कनवाळू असू शकतो? असा प्रश्न मनात आला असेल. ते वन्यजीव आहेत पण निर्दयी, क्रुर नाहीत. त्यांना आदर आणि प्रेम द्या. ते जगण्यासाठी हिंसा करतात आणि ते ही त्यांना उसकवल्यानंतरच'
सिंहाच्या कनवाळू रूपातील व्हिडीओ
वन्य जीव आणि त्यांच्याबाबत आश्चर्य चकीत करणार्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी चिता राजस्थान मध्ये एका पुजार्यासोबत रोज रात्री झोपायला आलेला पाहिला मिळाला आहे. तर कधी गुजरातच्या जूनागढ मध्ये हॉटेलच्या परिसरात बिनधास्त फिरणारा सिंह पहायला मिळाला आहे.