Gujarat: धक्कादायक! लग्नात गरबा खेळताना अचानक कोसळली; महिलेचा अवघ्या 17 सेकंदात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)

लग्नात गरबा आयोजित करण्यात आला होता. कल्पना तिच्या मुलाला कडेवर घेऊन इतर महिलांसोबत गरबा खेळत होती.

Woman dies of heart attack while playing garba (Photo Credits: Gujarat Tak YouTube)

सहसा असे म्हणतात की जीवनात कोणत्याच गोष्टीचा भरवसा नाही. त्यातल्या त्यात कोणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल यावरही कोणाचे नियंत्रण नसते. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील (Gujarat) गांधीनगरमध्ये (Gandhinagar) घडला आहे. येथे लग्नामध्ये गरबा (Garba) खेळणार्‍या एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि जागीच तिचा मृत्यू झाला. अवघ्या 17 सेकंदांमध्ये घडलेली ही घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्पना बेन गढवी असे या महिलेचे नाव असून ती 45 वर्षांची होती.

गांधीनगर जिल्ह्यातील रूपाल गावात राहणारी कल्पना आपल्या माहेरी एका विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आली होती. लग्नात गरबा आयोजित करण्यात आला होता. कल्पना तिच्या मुलाला कडेवर घेऊन इतर महिलांसोबत गरबा खेळत होती. खेळता खेळता अचानक ती कोसळली. तातडीने तिच्या सोबत असणाऱ्या लोकांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एका क्षणातच लग्नाचा आनंद शोकात बदलला. (हेही वाचा: एकाच मंडपात पार पडले आई आणि मुलीचे लग्न; UP च्या गोरखपूर जिल्ह्यातील अनोखा विवाहसोहळा चर्चेत)

पहा व्हिडिओ -

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कल्पना मोठ्या आनंदाने इतर महिलांसोबत गरबा खेळत आहे. मात्र अवघे काही स्टेप्स घेतल्यानंतर ती अचानक कोसळते व क्षणार्धात तिचा मृत्यू होतो. या घटनेमुळे कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर असे आढळले की कल्पनाला हृदयविकाराचा झटका आला होता. अवघ्या 17 सेकंदात गरबा खेळत असताना अचानक झालेल्या या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जेव्हा कल्पना जमिनीवर पडली तेव्हा तिच्या कडेवर एक लहान मूल होते. मात्र या घटनेदरम्यान मुलाला कोणतीही इजा झाली नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif