Couple Marries Over Video Call: अनोखा विवाह! वर तुर्कीत, वधू हिमाचलमध्ये...बॉसने लग्नासाठी नाकारली सुट्टी; जोडप्याने 'असं' केलं लग्न

मुळचा बिलासपूरचा रहिवासी असलेल्या अदनान मुहम्मदने आपल्या लग्नासाठी भारतात जाण्याची योजना आखली होती. तथापि, त्याच्या तुर्की बॉसने त्याची रजेची विनंती नाकारली.

Indian Marriage | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Couple Marries Over Video Call: आतापर्यंत अनोख्या पद्धतीने लग्न केल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, लग्नासाठी लागणारी सुट्टी नाकारल्याने एका जोडप्याने चक्क व्हिडिओ कॉलवर (Video Call) लग्न केलं. तुर्कस्तानमध्ये काम करणाऱ्या हिमाचलमधील एका तरुणाला त्याच्या बॉसने लग्नाच्या दिवशी सुट्टी दिली नाही. त्यामुळे तुर्कीमध्ये राहणारा वर आणि हिमाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या वधूने व्हिडिओ कॉलद्वारे 'व्हर्च्युअल निकाह' (Virtual Nikah) केला.

हिमाचलपासून 4 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या तुर्कस्तानमध्ये राहणाऱ्या वराने मंडीमध्ये राहणाऱ्या वधूसोबत लग्नगाठ बांधली. मुळचा बिलासपूरचा रहिवासी असलेल्या अदनान मुहम्मदने आपल्या लग्नासाठी भारतात जाण्याची योजना आखली होती. तथापि, त्याच्या तुर्की बॉसने त्याची रजेची विनंती नाकारली, ज्यामुळे परिस्थिती गुंतागुंत झाली. वधूच्या आजारी आजोबांची इच्छा होती की, त्यांच्या समोर त्यांच्या नातीचा लग्न सोहळा पार पडावा. यामुळे जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी पर्यायी उपाय शोधला. शेवटी एकमताने व्हिडिओ कॉलद्वारे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. (हेही वाचा -BharatMatrimony Fake Profile: भारत मॅट्रिमनी साईटवर विवाहितेच्या नावे फेक प्रोफाईल; महिलेने सोशल मीडियावर सांगितला धक्कादायक प्रकार)

वधू-वरांच्या कुटुंबीयांनी आभासी लग्नाला सहमती दर्शवल्यानंतर बिलासपूरहून लग्नाची मिरवणूक रविवारी मंडीत पोहोचली. अखेर सोमवारी व्हिडिओ कॉलिंगद्वारे जोडपे जोडले गेले आणि काझीने तीनदा कुबूल है... म्हणत दोघांचा विवाह केला. मुलीचे काका अक्रम मोहम्मद म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञानामुळेच हे लग्न शक्य झाले. (हेही वाचा, Tamil Nadu Crime: चैन्नईमध्ये Matrimonial Site वर बनवले पत्नीचे फेक प्रोफाइल, घटस्फोट हवा असल्याने पतीचे कृत्य)

गेल्या वर्षी जुलैमध्ये शिमल्यातील कोटगढ येथील आशिष सिंघा आणि कुल्लूमधील भुंतर येथील शिवानी ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न केले. कारण भूस्खलन आणि पुरामुळे मिरवणूक इच्छितस्थळी पोहोचू शकली नव्हती. याशिवाय, कोरोना महामारीच्या काळात केरळमधील एका व्यक्तीने झूम प्लॅटफॉर्मद्वारे लग्न केले होते. विशेष म्हणजे या जोडप्याने व्हर्च्युअल लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पाहुण्यांना झूम आयडी आणि पासवर्ड असलेले ई-आमंत्रण दिले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif