Google Year in Search 2023 in India: चांद्रयान-3, तुर्की भूकंप, मणिपूर यांसह या वर्षी इंटरनेटवर काय काय झाले सर्च? घ्या जाणून

सरत्या वर्षाला निरोप देताना इंटरनेटवर सर्जझालेले ट्रेंडही तपासले जातात. ज्यामध्ये चांद्रयान-3 पासून G20 शिखर परिषदेपर्यंतच्या अनेक घटना आणि घडामोडींचा समावेश आहे. या वर्षभरामध्ये काय काय ट्रेण्ड झाले आणि नेटीझन्सनी गूगलवर काय काय सर्च केले याबाबत Google ने माहिती दिली आहे.

Year Ender 2023: नववर्षाचे स्वागत करण्याचा दिवस हळूहळू जवळ येतो आहे. तसेच, 2023 या सरत्या वर्षाला निरोप द्यायचीही वेळ नजीक येत आहे. अशा वेळी या संबध वर्षामध्ये घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतला जातो. सहाजिकच इंटरनेटवर सर्जझालेले ट्रेंडही तपासले जातात. ज्यामध्ये चांद्रयान-3 पासून G20 शिखर परिषदेपर्यंतच्या अनेक घटना आणि घडामोडींचा समावेश आहे. या वर्षभरामध्ये काय काय ट्रेण्ड झाले आणि नेटीझन्सनी गूगलवर काय काय सर्च केले याबाबत Google ने माहिती दिली आहे. आपणही जाणून घेऊ शकता 2023 मध्ये काय झाले सर्वाधीक सर्च.

राष्ट्रीय गौरव आणि नैसर्गिक आपत्ती:

चांद्रयान-3 चे ऐतिहासिक यश आणि भारताचे G20 अध्यक्षपद यामुळे जागतिक उत्सुकता वाढली गेली. सहाजिकच त्या दृष्टीने गूगलवर किवर्ड सर्च करण्यात आले. यासोबतच कर्नाटक निवडणूक निकाल, समान नागरी कायदा, इस्रायल बातम्या आणि तुर्की भूकंप यासह स्थानिक आणि जागतिक घडामोडींबाबत नागरिकांनी जाणून घेतले.

स्वत:ची काळजी आणि तंत्रज्ञान कसे करावे:

त्वचा आणि केसांचे उपचार, झुडिओ, जिम, ब्युटी पार्लर आणि त्वचाविज्ञानी यांबाबत गोष्टी चर्च करण्यासाठीही नेटीझन्सनी भर दिला. YouTube वरील प्राधान्याने म्हणजे 5K अनुयायांपर्यंत तंत्रज्ञानविषयक अधिक गोष्टी चर्च करण्यात आल्या.

क्रिकेट आणि खेळ:

क्रिकेट विश्वचषक आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामने ट्रेंड झाले, भारतीय क्रिकेट जागतिक स्तरावर अव्वल ट्रेंडिंग संघ म्हणून रँकिंगमध्ये आहे. महिला प्रीमियर लीग, कबड्डी आणि बुद्धिबळ या गोष्टीही गूगलवर ट्रेण्ड झाल्या.

जागतिक स्तरावर भारतीय मनोरंजन:

जवान, गदर 2 आणि पठाण यांसारखे भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय हिट्सशी स्पर्धा करत जागतिक स्तरावर ट्रेंड झाले. केसरिया सारख्या गाण्यांनी आणि कियारा अडवाणी सारख्या कलाकारांनी जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेतले.

आपण येथे पाहू शकता गूगल ट्रेण्ड

ओटीटी वर्चस्व आणि मीम्स:

ट्रेंडिंग शोमध्ये स्थानिक ओटीटी सामग्रीचे वर्चस्व आहे. ज्यामध्ये फर्जी, असुर आणि राणा नायडू आघाडीवर आहेत. 'भूपेंद्र जोगी', 'सो ब्युटीफुल सो एलिगंट' आणि 'मोये मोये' यासह मीम्स इंटरनेट सेन्सेशन ठरले.

दरम्यान, व्हिएतनाम, इंडोनेशिया (बाली) आणि थायलंडसह आग्नेय आशिया ही प्रमुख पर्यटन स्थळे म्हणून उदयास आली. गोवा, काश्मीर, कुर्ग, अंदमान आणि निकोबार बेटांच्या स्थानिक सहलींना लोकप्रियता मिळाली. आंब्याचे लोणचे, पंचामृत, करंजी, थिरुवथिराऊ काली, उगडी पचडी, कोलुकट्टई आणि रवा लाडू यांच्या पाककृतींसह पाककला शोध प्रादेशिक सर्चमध्ये ट्रेण्डीग राहिले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement