'भारतातील वाईट मुख्यमंत्री' या गूगल सर्चवर केरळचे मुख्यमंत्री Pinarayi Vijayan च्या नावाचे रिझल्ट
'भारतातील वाईट मुख्यमंत्री' असे गूगलवर सर्च केल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांचे नाव झळकत आहे.
'भारतातील वाईट मुख्यमंत्री' असे गूगलवर सर्च केल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांचे नाव झळकत आहे. सोमवारी गूगल ट्रेंड्समध्ये सुमारे 20,000 सर्च रिझर्ल्ट्स दाखवण्यात आले आहे. गूगलची सर्च रिझल्ट दाखवण्याची प्रक्रिया ही किचकट असली तरीही सध्या केरळमध्ये सुरू असलेला शबरीमला मंदिरातील महिलाप्रवेशाच्या वादावरून मुख्यमंत्री हे टीकेचे धनी झाले आहेत.
सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना शबरीमला मंदिरामध्ये जाऊन अयप्पाचे दर्शन घेण्यास रोखले जाऊ शकत नाही असा निर्णय दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अयप्पाचं दर्शन घेऊ इच्छिणार्या महिलांना पोलिस संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून केरळमध्ये हिंसाचार भडकला आहे. यामध्ये अनेक जण जखमी तर ५५०० लोकांना अटक करण्यात आली आहे.
विजयन यांच्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतही असेच झाले होते. 'इडीयट' या शब्दाच्या रिझर्ल्टमध्ये डोनाल्ड ट्र्म्प यांचा फोटो दिसत होता.