गूगल क्लासरूम वरील शिक्षिकेने विद्यार्थ्याला पाठवले 15 Nude Photo; चाईल्ड पॉर्न साठी जबरदस्ती केल्याचा विद्यार्थ्याचा आरोप

डोरोथी वेरका असे या शिक्षिकेचे नाव असून ती स्वतः विवाहित आहे तसेच तिला 3 अपत्ये सुद्धा आहेत.

. Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: File Image)

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे, गूगल क्लासरूमच्या माध्यमातुन मुलांचे वर्ग घेणाऱ्या 42 वर्षीय एका शिक्षिकेनं आपल्या एका विद्यार्थ्याला चक्क स्वतःचे 15 न्यूड फोटो (Nude Photo) पाठवल्याचे प्रकरण उघड झाले आहे. डोरोथी वेरका असे या शिक्षिकेचे नाव असून ती स्वतः विवाहित आहे तसेच तिला 3 अपत्ये सुद्धा आहेत. याबाबत विद्यार्थ्याच्या घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे तसेच या मुलाचे लैंगिक शोषण तर केलेले नाही ना या चिंतेतून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डोरोथी ही मानसिक रुग्ण असून तिला चाईल्ड पॉर्न (Child Porn) विषयी आकर्षण आहे. यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढून त्यांना अशा प्रकारचे न्यूड फोटो पाठवायची व त्यांनतर चाईल्ड पॉर्न तयार करण्यासाठी ती अनेकांवर जबरदस्ती सुद्धा करत असे. याबाबत खुलासा होताच डोरोथी हिला अडीच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

डोरोथी हिने पीडित मुलाशी सुरुवातीला गूगल क्लासरूम च्या माध्यमातूनच संपर्क केला होता, यानंतर प्रायव्हेट मध्ये बोलण्यासाठी तिने त्या मुलाला स्नॅपचॅट वर मॅसेज करण्यास सांगितले, काही दिवसांनी या माध्यमातून त्यांच्यात फोटोचे आदान- प्रदान सुरु झाले. त्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये तिने पहिलयन्दा या मुलाला न्यूड फोटो पाठवले मार्च 2019 पर्यंत म्हणजेच तब्बल सहा महिने मुलानेही कोणाकडे याबाबत वाच्यता न करता मौन बाळगले. मात्र हळूहळू हे प्रमाण वाढू लागले शिक्षिका कालांतराने मुळाशी क्लास मध्ये सुद्धा अश्लील वर्तन करू लागली. Nude Cleaning Business: 3 मुलांची आई असलेली महिला विवस्त्र राहून करते घरकाम करण्याचा नवा व्यवसाय, तासाचे घेते 'इतके' रुपये

यामुळे वैतागून एकदा अलीकडेच या मुलाने आपल्या एका मैत्रिणीला याबाबत सांगितले आणि मग हिरे गोष्ट घरी कळवून त्या मुलाच्या पालकांनी पोलिसात शिक्षिकेविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी या महिलेवर 16 वर्षांहून कमी वयाच्या विद्यार्थ्यांशी अश्लील वर्तन करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.