Girlfriend in Trolley Bag: ट्रॉली बॅगमध्ये गर्लफ्रेंड लपवली, प्रियकराची चोरी सेक्युरीटीने पकडली (पाहा व्हिडिओ)

इतकेच नव्हे तर तिला भल्या मोठ्या ट्रॉली बॅगमध्ये (Girlfriend in Trolley Bag) भरुन तो वसती गृहाच्या बाहेरही पडण्याच्या नादात होता. पण, सुरक्षा रक्षकांना संशय आला आणि त्यांनी त्याला बॅग उघडायला सांगितली. इथेच गंमत झाली आणि प्रियकराची चोरी पकडली गेली.

| (Photo Credits-Twitter)

'माणूस प्रेमात पडला की काहीही करतो.' अनेकदा प्रियकरला किंवा प्रेयसीला खूश करण्यासाठी अनेक महामाभाग नाना उद्योग करतानाही आपण पाहिले असेल. पण इथे एक प्रियकर चक्क आपल्याच प्रेयसीची चोरी करत होता. इतकेच नव्हे तर तिला भल्या मोठ्या ट्रॉली बॅगमध्ये (Girlfriend in Trolley Bag) भरुन तो वसती गृहाच्या बाहेरही पडण्याच्या नादात होता. पण, सुरक्षा रक्षकांना संशय आला आणि त्यांनी त्याला बॅग उघडायला सांगितली. इथेच गंमत झाली आणि प्रियकराची चोरी पकडली गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. आता या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला आहे. हा ट्रेंडीग होत असलेला व्हायरल व्हिडिओ (Trending Viral Video) पाहून तुम्हालाही कदाचित आपल्याच कपाळावर हात मारुन घ्यावा लागू शकतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एका गेटवर एक मुलगा एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन येतो. सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने ते ही बॅग त्याला उघडण्यास सांगतात. बॅग उघडल्यानंतर बॅगेत जे दिसते ते पाहून सुरक्षा रक्षकांनाही काहीसा धक्का बसतो. बॅगमध्ये कपडे किंवा इतर काही तत्सम साहित्य नसते. तर चक्क एक मुलगी असते. बॅग उघडल्यानंतर ही मुलगी बॅगमधून उभी राहते. (हेही वाचा, Female Judge Kiss Prisoner: कैद्याचे चुंबन घेताना महिला न्यायाधीश कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

ट्विट

सोशल मीडियावर PLidhoo नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या ट्विटर अकाऊंवर या व्हिडिओबाबत माहितीही देण्यात आली आहे. या माहितीमध्ये म्हटले आहे की, 'हा फारच मजेशीर व्हिडिओ आहे. मणिपूर विद्यापीठातील एक विद्यार्थी आपल्या गर्लफ्रेंडला ट्रॉली बॅगमध्ये भरुन बाहेर निघाला होता. कदाचीत याच्यावर नेटफ्लिक्सचा प्रभाव असावा'. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची  पुष्टी करत नाही. पण सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif