6 फूटी Monitor Lizard जेव्हा Thailand च्या 7-Eleven स्टोअर मध्ये वस्तूंवरून झपझप चढते; सोशल मीडीयात झपाट्याने वायरल होतोय हा स्तब्ध करणारा व्हिडीओ (watch Video)
थायलंड मध्ये 7-Eleven store मध्ये घडली आहे. या दुकानात रचून ठेवलेल्या वस्तूंवरून monitor lizard चढत गेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये ट्वीटर, इंस्टाग्राम वर चांगलाच वायरल होत आहे.
तुम्ही डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये शॉपिंग साठी गेले आहात आणि तुमच्यासमोर एक महाकाय सरपटणारा प्राणी फळींवर ठेवलेल्या वस्तूंवर चढताना दिसला तर तुम्ही काय रिअॅक्ट कराल? सहाजिकच हे चित्र मनाचा थरकाप उडवणारं असेल. दरम्यान ही घटना प्रत्यक्षात थायलंड मध्ये 7-Eleven store मध्ये घडली आहे. या दुकानात रचून ठेवलेल्या वस्तूंवरून monitor lizard चढत गेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये ट्वीटर, इंस्टाग्राम वर चांगलाच वायरल होत आहे. नेटकर्यांनी देखील त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
Journalist Andrew MacGregor Marshall यांनी हा व्हिडिओ ट्वीटर वर शेअर केला आहे. हा प्रकार थायलंड मधील असला तरीही तो नेमका कधी घडला याची तारीख, वेळ देण्यात आलेली नाही पण यामध्ये monitor lizard ही स्टोअरच्या फळीवर वस्तूंवरून चढताना दिसत आहे. मागील 24 तासांतच या व्हिडिओवर 93.6k व्ह्यूज आहेत. 1.3k रिट्विट्स आहेत.
Andrew MacGregor Marshall चं ट्वीट
पहा व्हिडीओ
7-Eleven store मध्ये ही monitor lizard समानांचा आधार घेत वर चढताना दिसली. त्यानंतर वर पोहचल्यावर ती समानावरच बसली. या दरम्यान अनेक वस्तू खाली पडल्या सामानांचं नुकसान झालं. यावेळी स्टोअर मध्ये असलेल्या काही लोकांचा आवाज व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे. त्यांच्यापैकी काही जण नर्व्ह्स होऊन हसत आहे तर काही स्तभच झाले असतील. Southwest News Service च्या माहितीनुसार ही 6 फूटी पाल जवळच्या कनाल मधून आली असावी. Huge Monitor Lizard Viral Photos: दिल्ली मध्ये घराबाहेर स्पॉट झाली महाकाय पाल; आकार पाहून नेटिझन्स म्हणतात हा असू शकतो Komodo Dragon.
Mundo Nomada या थाई ट्रॅव्हल एजंसी कडून ट्वीटर वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, बॅकॉंक मध्ये या पाली आढळणं सामान्य आहे. पण सुपरमार्केट मध्ये तिचं येणं हे विरळ आहे. ही पाल सामान्यपणे मृत प्राण्यांच्या मांसावर जगते. University of Michigan Museum of Zoology च्या माहितीनुसार ती माणसांना त्रास देत नाही, इजा पोहचवत नाही पण तिचा आकार पाहून भीती वाटणं सहाजिक आहे. तर monitor lizard अशी मानवी वस्तीमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. 2016 मध्येही बॅंकॉकच्या Lumpini Park मध्ये ती सरपटताना दिसली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)