Ghost at Park: दिल्लीच्या Japanese Park मध्ये रात्री अचानक भुताने केला व्यायाम? जाणून घ्या नक्की काय आहे ‘या’ झांशीच्या व्हायरल व्हिडिओचे प्रकरण (Watch Video)

अनेक लोक त्यांनी भूत पाहिले असल्याचा दावाही करतात. जगात अनेक जागा बाधित जागा म्हणून प्रसिद्ध आहेत व त्यांचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

Ghost Exercising in Park (Photo Credit : Youtube)

Ghost Exercising in Park: आजपर्यंत आपण सर्वांनीच भूताखेतांच्या (Ghost) गोष्टी ऐकल्या असतील. अनेक लोक त्यांनी भूत पाहिले असल्याचा दावाही करतात. जगात अनेक जागा बाधित जागा म्हणून प्रसिद्ध आहेत व त्यांचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. अशात आता सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रात्री अचानक एका गार्डनमधील एक व्यायाम करण्याचे मशीन हलताना दिसत आहे, मात्र या ठिकाणी कोणीही व्यायाम करताना दिसत नाही. एक भूत व्यायाम करत असल्याचे सांगत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिल्लीच्या रोहिणी परिसरातील Japanese Park मधील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ झांशीचा (Jhansi) असल्याचे समोर आले आहे.

झांसी शहरातील एका उद्यानात आपोआप हलणाऱ्या व्यायामाच्या मशीनचा  व्हिडिओ, शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओ आणि त्याची चर्चा पोलिसांपर्यंत पोहोचली. गुरुवारी सीओ सिटी चौकशीसाठी याठिकाणी दाखल झाले होते. पोलिस तपासात हा व्हिडिओ नंदनपुरा येथील कांशीराम पार्कचा असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी जवळपास बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले. असा विश्वास व्यक्त केला गेला आहे की, कोणीतरी चेष्टा केली आहे. एक पातळ तार बांधून या मशीनला हलवण्यात आले व नंतर व्हिडिओ व्हायरल केला. (हेही वाचा: क्वारंटाइन सेंन्टरमध्ये रंगला क्रिकेटचा सामना; जॉन्टी रोड्स यांनी शेअर केलेला व्हायरल व्हिडिओ पाहून कठीण काळात तुमच्यातही जोश भरेल (Watch Video))

पहा व्हिडिओ -

या व्हिडिओमध्ये रात्री पार्कमध्ये व्यायामाचे मशीन आपोआप हलताना दिसत आहे. हा व्हिडिओ शहरात व्हायरल झाला आहे, ही बाब लक्षात आल्यानंतर एसएसपी डी प्रदीप कुमार यांनी सीओला चौकशीचे निर्देश दिले. गुरुवारी रात्री सीओ सिटी संग्राम सिंह आणि सीपरी पोलिस उद्यानात चौकशीसाठी पोहोचले होते. याबाबत आजूबाजूंच्या लोकांकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. जरी कुणी खोडसाळपणा केला असेल, तरी याबाबत चौकशी होणार असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.