Gaur Hit Auto Rickshaw: रानगवा जेव्हा रिक्षा उचलतो तेव्हा काय घडते? पाहा व्हायरल व्हिडिओ

या पूर्वी अनेकदा अशा घटना घडल्याचे आपण पाहिले आहे. अशीच एक घटना व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Videos) झाली आहे. या घटनेत एक गवा (Wild Animal Gava) चक्क ऑटो रिक्षा ( Gaur Hit Auto Rickshaw) उचलताना दिसतो आहे.

Gaur Viral Videos | (Photo Credits: You Tube)

नागरी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर ही बाब आता नवी राहिली नाही. या पूर्वी अनेकदा अशा घटना घडल्याचे आपण पाहिले आहे. अशीच एक घटना व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Videos) झाली आहे. या घटनेत एक गवा (Wild Animal Gava) चक्क ऑटो रिक्षा ( Gaur Hit Auto Rickshaw) उचलताना दिसतो आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र व्हिडिओत स्पष्ट दिसते की, जंगलातील एक मस्तवाल गवा (Gava) रिक्षाला धडक देऊ पाहतो आहे. आपले ताकदवान शिंगाने तो रिक्षाचा (Auto Rickshaw) पुढचा भाग उचलताना दिसतो आहे. विशेष म्हणजे गव्याची ताकद इतकी आहे की, तो ऑटोरिक्षा सहज उचलतो आहे. गव्याने आणखी तागद लावली नाही म्हणून बरे नाहीतर रिक्षा थेट उलटलीच असती.

रात्रीची वेळ अल्याने रिक्षा रस्त्यावर पार्क केली होती. महत्त्वाचे म्हणजे रिक्षा पार्क केल्याने तिच्यामध्ये चालक अथवा कोणी प्रवासी नव्हते. जर प्रवासी अथवा चालक असता आणि गव्याने रिक्षाला धडक दिली असती तर कदाचित अनर्थ घडू शकला असता. टीव्ही नाईनने याबाबत वृत्त दिले आहे. या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये आढळून आले आहे की, नागरी वस्तीत वन्य प्राणी घुसले की नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. नागरिकांनी गर्दी केली की, हे प्राणी बिथरतात आणि सैरावैरा धावू लागतात. त्यामुळे कधी ते नागरिकांवर हल्ले करतात तर कधी त्यांना नागरी वस्तीची सवय नसल्याने दिशाहीन धावताना ते जखमी होतात. (हेही वाचा, Deers Spotted In Pune: गवा दिसला, आता पुणे येथे हरणांचा कळप करतोय मुक्तसंचार; शिवणे परिसरात मानवी सोसायटीत वावर)

व्हिडिओ

पुणे येथे या आधी असाच एक गवा वाट चूकून शहरात भटकला होता. हा गवा पुणे शहरातील महात्मा सोसायटीत आला होता. गव्याला पाहून नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या गव्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे (Forest department) एक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने गव्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता सुरु झाली पकडापकडी. अखेर एक तासभर उलटून गेल्यानंतर वन विभागाने गव्याला दोन इंजेक्शन दिली आणि जाळी टाकून त्याला पकडले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, गव्यावर शहरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. तसेच लोकवस्ती पाहून बिथरलेला गवा इकडेतिकडे धावत होता. या घटनेत गव्याने काही सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. गव्याच्या प्रवेशाने काही ठिकाणी सोसायट्यांच्या फाटकाचे नुकसान झाल्याचेही पाहायला मिळाले.