Viral Video: चांगलंचुंगलं खायला बनवलं, फोटोच्या नादात सांडून गेलं; महिलेसोबत असं काय घडलं? पाहा व्हिडिओ
आपल्याला माहित असेलच आजकाल कोणतीही गोष्ट असेल तर त्याला सेल्फीचे 'चार चाँद' लागल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. ज्याला त्याला वाटते की आपण कोणतीही गोष्ट केली की लगेच त्याचा फोटो किंवा सेल्फी घेतलाच पाहिजे. नंतर हे फोटो ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप अशा माध्यमातून सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केले जातात.
सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही तर भलतेच मजेशीर असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video) झाला आहे. जो पाहून आपल्यालाही हसू कदाचित आवरणार नाही. आपल्याला माहित असेलच आजकाल कोणतीही गोष्ट असेल तर त्याला सेल्फीचे 'चार चाँद' लागल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. ज्याला त्याला वाटते की आपण कोणतीही गोष्ट केली की लगेच त्याचा फोटो किंवा सेल्फी घेतलाच पाहिजे. नंतर हे फोटो ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप अशा माध्यमातून सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केले जातात. हे सर्व करताना कधीकधी गंमत आणि अनेकदा फजीतीही होते. इथल्या व्हिडिओत असेच काहिसे दिसते.
व्हायरल व्हिडिओत इथे पाहायला मिळते आहे की, एक महिला टेबलावर ठेवलेल्या पदार्थांचे फोटो काढत आहे. बहुदा ही एखाद्या पार्टीची तयारी असावी किंवा हे पदार्थ स्वत: घरीच बनवले गेले असावेत. भोजनापूर्वी या महिलेला या पदार्थांचे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. ती मोबाईल कॅमेरा सुरु करुन पदार्थांचे फोटो काढण्यास सुरुवात करते. त्यासाठी ती एक खुर्चीही वापरते. खुर्चीवर उभा राहून ती फोटो काढत असते. इतक्यात खुर्चीवरुन तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. झाले. तिचा धक्का पदार्थ ठेवलेल्या टेबलला लागतो आणि सगळे पदार्थ खाली सांडतात. सहाजिकच सरगळ्यांचा रसभंग होतो. (हेही वाचा - Mango Maggi Viral Video: महिलेने बनवली 'मँगो मॅगी'; व्हिडिओ पाहून संतापले नेटीझन्स, Watch)
व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. हा व्हिडिओ punjabi_industry__नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्या आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 7 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. लोकांना हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर वाटला, असे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन तरी दिसते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)