सोशल मीडीयावर #MeToo मिम्सचा पाऊस !
हॉलिवूडपासून सुरू झालेले #MeToo चं वादळ आता अगदी भारतामध्ये हिंदी टेलिव्हिजनवर काम करणार्या स्त्री-कलाकारांपर्यंत पोहचलं आहे.
#MeToo ही मोहिम स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणारी जागतिक स्तरावरील मोहिम आहे. कॉर्पोरेट क्षेत्र, झगमगती सिनेसृष्टी यामध्ये आज स्त्रियांदेखील आत्मविश्वासाने वावरतात. परंतू एकूणच स्त्रियांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी आणि पुरूषांमधील विकृती यामुळे अनेकदा महिलांना नाहक मानसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागतो.
हॉलिवूडपासून सुरू झालेले #MeToo चं वादळ आता अगदी भारतामध्ये हिंदी टेलिव्हिजनवर काम करणार्या स्त्री-कलाकारांपर्यंत पोहचलं आहे. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामधील वादातून भारतामध्ये #MeToo मध्ये अनेकींनी उडी मारली आहे. रोज एक नवं प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे या मोहिमेचा कोणी गैरवापर करून केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तर #MeToo म्हणत नाही ना?
सोशल मीडीयावर व्हायरल झाले #MeToo वरील मिम्स
अभिनेत्री हुमा खुरेशीने मुलींना खरं बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे #MeToo ची किती प्रकरणं खरी आहेत याचा विचार करावा लागणार आहे.