Funny Cricket Moments: चड्डीत लपवला बॉल! पोलीस येताच 'मोये मोये'; क्रिकेट स्टेडियमवरील घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)

क्रिकेटच्या मैदानावर तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर केला जातो. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तैनात असतात. परिणामी मैदानावर घडणारी प्रत्येक छोटी-मोठी बाब कॅमेऱ्यात कैद होते. यामध्ये पंचायत होते ती प्रेक्षकांमध्ये असलेल्या चाहत्यांची. बिच्चारे अनेक गोष्टी, कृती करत असतात. हीच त्यांची कृती कॅमेऱ्याने त्यांच्या नकळत टीपली जाते आणि मग व्हायरलहोते.

Funny Cricket Moments | (Photo Credit: X)

Funny Cricket Moments Video: क्रिकेटच्या मैदानावर अनेक मजेशीर घटना घडत असतात. पूर्वी त्या तितक्या पुढे येत नसत. अलिकडे मात्र क्रिकेटच्या मैदानावर तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर केला जातो. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तैनात असतात. परिणामी मैदानावर घडणारी प्रत्येक छोटी-मोठी बाब कॅमेऱ्यात कैद होते. यामध्ये पंचायत होते ती प्रेक्षकांमध्ये असलेल्या चाहत्यांची. आपल्याकडे कोणाचीच नजर नाही असे समजून बिच्चारे अनेक गोष्टी, कृती करत असतात. हीच त्यांची कृती कॅमेऱ्याने त्यांच्या नकळत टीपली जाते आणि मग ती भव्य पडद्यावर येते, व्हायरलही (Viral Video) होते. ज्यामुळे मराठीतील 'ओरडून पोळी आणि चोरुन गुळवणी' असा प्रकार होतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असाच काहीसा प्रकार पाहयाल मिळतो. ज्यामध्ये 'चड्डीत लपवला बॉल! पोलीस येताच मोये मोये' अशी एका क्रिकेट चाहत्याची अवस्था झाल्याचे दिसते.

एक्स वापरकर्त्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेली घटना नेमकी कोणत्या क्रिकेट सामन्यावेळी घडली याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र, या घटनेचे दृश्य Mufaddal Vohra नावाने असलेल्या @mufaddal_vohra या 'X' हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यापासून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि तितक्याच लोकांनी लाईक आणि सामायिकसुद्धा केला आहे. शिवाय व्हिडिओखाली अनेक एक्स वापरकर्त्यांनी प्रतिक्रियाही तितक्याच भन्नाट दिल्या आहेत. (हेही वाचा, Boy Death While Playing Cricket: खेळ जीवावर बेतला! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना)

व्हिडिओ

पोलिसामुळे आनंदावर विरजण

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सामन्यादरम्यान गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने सीमेपार फटकावला आहे. बहुदा तो चौकार किंवा षटकारच असवा. चेंडू मैदानाची सीमारेषा ओलांडून थेट प्रेक्षकांमध्ये येतो. शक्यतो प्रेक्षकांमध्ये आलेला चेंडू मैदानात परत केला जातो. पण, या दृश्यात काहीसे वेगळे पाहायला मिळते. एक प्रेक्षक मैदानातून आलेला आणि हाती लागलेला चेंडू पकडतो आणि तो थेट फूल पँटच्या आत असलेल्या चड्डीत लपवतो. आता चेंडू आपल्याला मिळालाच म्हणून तो काहीसा आनंदात असतो. मात्र, पुढच्या काहीच क्षणात कर्तव्यावर असलेला वर्दीतील पोलीस तिथे पोहोचतो आणि क्रिकेट चाहत्याच्या आनंदावर विरजण पडते. पोलीस त्याला चड्डीत लपवलेला चेंडू काढायला सांगतो. तो चाहताही तो चेंडू काढून देतो. जो पोलीस पुन्हा एकदा सीमारेशेच्या आत मैदानावर फेकतो. (हेही वाचा, Bumrah bowling “Gumrah” Delivery: हे कसले क्रिकेट? लोकल बुमराने उडवला बॅट्समनच्या तोंडाचा त्रिफळा, लोक म्हणाले 'Please call Physio' (Watch Video))

व्हिडिओ

वापरकर्त्यांची मिष्टीकल टीप्पणी

दरम्यान, चेंडू मैदानावर फेकल्यावर पोलीस सदर प्रेक्षकातील चाहत्याला दमदाटी करुन मैदानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. ही घटना पाहून अनेक एक्स वापरकर्त्यांनी पोलिसाच्या वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी चेंडू लपविणाऱ्या चाहत्याला दोष दिला आहे. काहींनी मात्र, 'या चाहत्याकडे काही काळासाठी का होईना तीन चेंडू होते', अशी मिष्कील टीप्पणी केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now