'Aankh Marey' गाण्यावरील 'या' दोन मुलींचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, YouTube वर 8 लाखाहून अधिक व्ह्युज

हा व्हिडिओ 12 डिसेंबरला अपलोड करण्यात आला आहे. बघता बघता या व्हिडिओने युट्युबवर 8 लाख व्ह्युजचा टप्पा पार केला आहे.

'आंख मारे' गाण्यावरील 'या' दोन मुलींचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल (Photo Credits: You Tube)

केदारनाथ सिनेमानंतर सारा अली खान (Sara Ali Khan) अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) आगामी 'सिम्बा' (Simmba) या सिनेमातून दिसणार आहे. दमदार एनर्जी, अ‍ॅक्शनपॅक्ट ट्रेलरला जसा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे तसाच प्रतिसाद सिनेमाच्या गाण्यांनादेखील मिळत आहे. सारा आणि रणवीर यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'आंख मारे'  (Aankh Marey)  हे गाणं सध्या युट्युबवर धुमाकूळ घालत आहे. नव्या पद्धतीने बनवलेलं गाणंही लोकांच्या पसंतीला उतरल्याने त्यावर डान्स करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.

युट्युबवर सिम्बातील रणवीर आणि साराच्या गाण्याबरोबरच दोन मुलींनी केलेला डांसदेखील तुफान व्हायरल होत आहे. Funk n Fusion Squad या युट्युब चॅनेलवर दोन मुलींचा खास व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 12 डिसेंबरला अपलोड करण्यात आला आहे. बघता बघता या व्हिडिओने युट्युबवर 8 लाख व्ह्युजचा टप्पा पार केला आहे.

सिम्बा सिनेमातील आंख मारे हे गाणं (Aankh Marey) 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेरे मेरे सपने' या सिनेमातील गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. नेहा कक्कड (Neha Kakkar), मीका सिंग (Mika Singh) आणि कुमार सानू (Kumar Sanu) यांनी हे गाणे गायले आहे.