Fungus Found Inside Patties: वाराणसीतील प्रसिद्ध बेकरीतील पॅटीजमध्ये आढळली बुरशी, पहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ पाहुन नेटीझन्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Fungus Found Inside Patties (PC - X/@vani_mehrotra)

Fungus Found Inside Patties: उत्तर प्रदेशातील वाराणसी (Varanasi) मधील रामकटोरा येथे असलेल्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेल्या पॅटीजमध्ये बुरशी आढळली (Fungus Found Inside Patties) आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने ग्राहकाने गोंधळ घालत बेकरी मालकाला जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकाने घेतलेल्या सर्व पॅटीसमध्ये बुरशी आढळली. हा व्हिडिओ पाहुन नेटीझन्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला पॅटीज बदलून देण्याची ऑफर दिली. परंतु, ग्राहकाने त्यास नकार दिला आणि त्याऐवजी हॉटेलमध्ये FSSAI अधिकाऱ्याला फोनवर संपर्क साधला. ग्राहकाने घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती अधिकाऱ्याला दिली. तथापी, ग्राहकाने अन्नपूर्णा स्वीट हाऊस आणि बेकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोजनालयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा -'Blood' In Burger King Meal: धक्कादायक! बर्गर किंगमधून मागवलेल्या जेवणात आढळले रक्त; आउटलेट तात्पुरते बंद (Video))

पहा व्हिडिओ -

सुदैवाने पॅटीस खाण्यापूर्वी ग्राहकाने ते उघडून पाहिले. परंतु, जर त्याने ते उघडून पाहिले नसते तर त्याने बुरशीची लागण झालेल्या पॅटीचे सेवन केले असते. तथापी, ग्राहकाने तक्रार नोंदवून बेकरीविरोधात कडक कारवाई करण्याचं आवाहन FSSAI अधिकाऱ्यांना केलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून पुन्हा एकदा बाहेरील अन्न पदार्थांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.