Farmer Protest: कृषी कायद्याविरोधात आयोजित महापंचायत कार्यक्रमाचा मंच कोसळला; शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते खाली आले
या व्यासपीठावर भारतीय किसान यूनियन (BKU) प्रमुख राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि इतर काही नेते उपस्थित होते. ही महापंचायत हरियाणातील जींद (Jind ) जिल्ह्यातील कंडोला गाव येथे आयोजित करण्यात आली होती.
केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Law 2020) शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. केंद्र सरकारच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जिंद येथे आयोजित ‘महापंचायत' (Mahapanchayat) दरम्यान व्यासपिठच कोसळले. या व्यासपीठावर भारतीय किसान यूनियन (BKU) प्रमुख राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि इतर काही नेते उपस्थित होते. ही महापंचायत हरियाणातील जींद (Jind ) जिल्ह्यातील कंडोला गाव येथे आयोजित करण्यात आली होती. या महापंचायतिस काही खाप पंचायत नतेही उपस्थि होते. या महापंचायतीचे आयोजन टेकराम कंडेला याच्या नेतृत्वाखाली सर्वजाती कंडेला खापने केले होते.
शेतकरी आंदोलनाची व्यप्ती वाढविण्यासाठी आणि ते अधिक आक्रमक करण्यासाठी ही महापंचायत आयोजित केली होती. जींद येथे कंडेला खाप द्वारा आयोजित या महापंचायतीस सर्व समूहाचा पाठिंबा होता असे सांगितले जात आहे. राकेश टिकैत हे कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच मोठ्या संख्येने शेतकरी महापंचायतस्थळी जमले होते. (हेही वाचा, Mia Khalifa ने शेतकरी आंदोलनावर ट्वीट करत दर्शवला थेट पाठिंबा; दिल्ली तील परिस्थितीवर 'ही' प्रतिक्रिया!)
जवळपास दोन दशकांहून अधिक काळ हरियाणा राज्यात चालवल्या जाणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या कंडेला खाप ने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आपला पाठिंबा आंदोलनकांना दिला आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी झालेल्या गोंधळानंतर शेतकऱ्यांवर आणि आंदोलकांवर विविध आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे व्यथित झालेले राकेश टिकैत प्रसारमाध्यमांसमोर भावूक झाले. त्याचा शेतकरी वर्गावर मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांनी पंजाब, हरियाणा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहभाग दाखवला. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोहोचले.