Fact Check: 196 व्या वर्धापनदिनानिमित्त कॅडबरी कंपनी प्रत्येकाला 500 चॉकलेट बास्केट्स फ्री देणार? व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य काय?
काय आहे या मेसेजमागील सत्य? जाणून घ्या...
देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या सर्वचजण घरी आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अधिक वेळ घालवला जातो. यामुळे अनेकदा लेटेस्ट अपडे्टस जाणून घेणे शक्य होत असेल तरी अनेकजण चुकीची किंवा खोटी माहिती, फेक न्यूज यांना बळी पडत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक न्यूज, मेसेजेसचे प्रमाण वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या या गंभीर काळात तर फेक न्यूजला उधाण आले आहे. तरी अनेकदा फेक मेसेजेसचे फॅक्ट चेक करुन सत्य लोकांसमोर आणले जाते. कोरोना मेसेजेस शिवाय अनेक खोटे मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत. कॅडबरी कंपनी वर्धापनदिनानिमित्त चॉकलेटचे फ्री बास्केट्स वाटत आहेत, असा मेसेज सोशल मीडियावर फिरु लागला आहे.
"कॅडबरी कंपनी त्यांच्या 196 व्या वर्धापनदिनानिमित्त चॉकलेटचे 500 फ्री बास्केट्स प्रत्येकाला देत आहे." असा मेसेज व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर फिरत आहे. मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. ती लिंक फेक आहे. (लॉकडाऊनमुळे परदेशात अडलेल्या नागरिकांना परतण्यासाठी 'RESCUE FLIGHTS FROM INDIA' गूगल फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल; PIB Fact Check सांगितले सत्य)
व्हायरल होणारा मेसेज:
अशा प्रकाराचा मेसेज 2019 च्या दिवाळी दरम्यानही सोशल मीडियावर व्हायरल होत होता. विशेष म्हणजे काही मेसेजमध्ये चॉकलेट बास्केट्सची संख्या वेगळी लिहिली होती. तोच मेसेज पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. फक्त दिवाळी ऐवजी वर्धापनदिनाचे कारण देण्यात आले आहे. काही युजर्सने हा मेसेज ट्विटरवर शेअर करत कॅडबरी कंपनीला टॅग केले. त्यानंतर ही लिंक फेक असून कंपनीची अशा कोणत्याही प्रकारची स्किम नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने दिलेले स्पष्टीकरण:
मेसेजमधील लिंकही फेक वेबसाईटने दिलेली असून त्यात युजर्सची माहिती भरण्यास सांगितली आहे. अशा प्रकारे युजर्संना फसवण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही असे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे खुद्द कॅडबरी कंपनीने देखील हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा प्रकारच्या मेसेजेंना बळी पडून नका. विशेष म्हणजे लिंक वर क्लिक करुन लिंक ओपन करु नका. तसंच अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणं थांबवा आणि तुम्हाला फेक मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीलाही याबाबत सतर्क करा.