Fact Check: ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करा अशा मेसेजद्वारे लोकांची फसवणूक; जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य
कोविड-19 संकटात अनेक फेक आणि दिशाभूल करणारे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांच्या अस्वस्थेत भर पडत आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे.
कोविड-19 (Covid-19) संकटात अनेक फेक आणि दिशाभूल करणारे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांच्या अस्वस्थेत भर पडत आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) अॅप (App) डाऊनलोड करा, असे सांगण्यात आले आहे. या अॅपद्वारे मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी चेक करु शकता. असे मेसेजमध्ये सांगण्यात आले असून अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे.
Social Media Hoax Slayer यांनी यासंदर्भात 3 डॉक्टरांशी चर्चा केली. तेव्हा डॉक्टरांनी अशा अॅपची शक्यता नाकारली आहे. हा अॅप आता गुगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आला आहे. हा अॅप ओपन करणारी लिंक आता चालत नसून “we’re sorry, the requested URL was not found on this server" असा मेसेज स्क्रिनवर दिसत आहे.
Fake Viral Message:
तेलंगणा पोलिसांनी देखील हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, #CyberFraudAlert: खोट्या लिंकपासून सावध रहा. यात तुमचे ऑक्सिजन लेव्हल फ्री मध्ये तपासण्यासाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. याद्वारे तुमच्या मोबाईलमधील डेटा रिड होऊ शकतो. याद्वारे फसणूक होऊ शकते.
Tweet by Telangana Police:
तसंच अशाप्रकारच्या फेक मेसेजेसवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पर्सनल डेटा ऑथेंटिकेशनसाठी हाताचे पहिले बोट वापरले जाते. या अॅपमध्ये आपले पहिले बोट कॅमेऱ्यावर ठेवण्यास सांगितले जाते आणि त्यातून ऑक्सिजन लेव्हल सांगण्यात येईल, असा दावा केला जातो. परंतु, आपल्या पहिल्या बोटाला स्कॅन करुन त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेजची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)