Fact Check: देशात विक्रमी कोरोना लसीकरण झाल्याच्या आनंदात सरकार देत आहे मोफत 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

आता लसीकरणाबाबत (Vaccination) एक खोटा दावा केला जात आहे

Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या दरम्यान कधी ऑक्सिजन तर कधी लसीचा प्रभावीपणा, तर कधी औषधांच्या उपलब्धतेबाबत अनेक खोटे दावे केले गेले. आता लसीकरणाबाबत (Vaccination) एक खोटा दावा केला जात आहे. एकीकडे लोकांना कोरोना लसीकरणाबद्दल जागरूक केले जात आहे, तर काही लोक त्याबद्दल बनावट बातम्या पसरवत आहेत. एका व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, देशात विक्रमी कोरोना लसीकरण झाल्याच्या आनंदात, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सर्व भारतीय वापरकर्त्यांना मोफत 3 महिन्यांचे मोबाईल रिचार्ज देत आहे.

मेसेजमध्ये असेही म्हटले आहे की जर तुमच्याकडे Jio, Airtel किंवा Vi SIM असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, व त्यात म्हटले आहे की तुम्ही या लिंकवर क्लिक करून रिचार्ज करू शकता. मेसेजमध्ये असेही लिहिले आहे की ही ऑफर फक्त 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध आहे, म्हणून त्वरित याचा लाभ घ्या.

सरकारसाठी, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांची तथ्यता तपासणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक टीमने या बातमीचीही तपासणी केली.  पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, हा दावा लोकांची दिशाभूल करणारा असून, भारत सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

(हेही वाचा: Fact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल? रेशन कार्ड जप्त होईल? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

अशाप्रकारे एकीकडे सोशल मीडियामुळे लोकांसाठी अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. मात्र त्याचबरोबर खोट्या बातम्या, दिशाभूल करणारे दावे, याबर गुणही यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो वेळोवेळी लोकांना अलर्ट करत असते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif