Fact Check: ऑनलाईन शिक्षणासाठी MCA 8 वी ते PUC 1 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ 3,500 रुपयांत देणार लॅपटॉप? PIB ने सांगितले सत्य
फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची, दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरु लागली. त्यात आता अजून एका जाहिरातीची भर पडली आहे.
कोरोना व्हायरस संकट काळात फेक न्यूजला उधाण आले. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची, दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरु लागली. त्यात आता अजून एका जाहिरातीची भर पडली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs) इयत्ता 8 वी ते प्री युनिव्हर्सिटी कोर्सच्या 1 पहिल्या वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप केवळ 3500 रुपयांत मिळणार आहे. कोविड-19 ऑनलाईन इज्युकेशन पर्पज (COVID19 Online Education Purpose) अंतर्गत MCA ने विद्यार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात येत आहे. अशी जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच यासाठी विद्यार्थ्यी व पालकांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे ओळखपत्र आणि त्यांच्या शिक्षकांचा संपर्क क्रमांक मागण्यात येत आहे.
या जाहिरातीची तपासणी केली असता ही जाहीरात फेक असल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करत ही जाहीरात फेक असून MCA अशा कोणत्याही प्रकारच्या प्रोग्रॅममध्ये संलग्न नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच MCA कडून अशा कोणत्याही प्रकारची ऑफर देण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. (Fact Check: 25 सप्टेंबर पासून पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन लागू होणार? PIB ने केला व्हायरल मेसेजचा खुलासा)
जाहिरातीमध्ये केलेला दावा: कोविड-19 ऑनलाईन एज्युकेशन पर्पज अंतर्गत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय 8 वी ते प्री युनिव्हर्सिटी कोर्सच्या 1 पहिल्या वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ 3500 रुपयांत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पीआयबी फॅक्ट चेक: ही जाहीरात फेक असून MCA अशा कोणत्याही प्रकारची ऑफर सुरु केलेली नाही.
Fact Check by PIB:
अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहीराती, संदेश यावर विश्वास ठेऊ नका. यामुळे तुमचे मोठे नुकसान होण्याची होऊ शकते. अफवा, फेक न्यूज नागरिकांना पॅनिक करण्याचे काम करतात. त्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेऊ नका, असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येते. तसंच अशा प्रकराचे मेसेजेस निर्दशनास आल्यास त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.