IAF C17 Airlifts द्वारा अफगानिस्तानातून खरोखरच 800 भारतीयांना आणले? नेटीझन्सनी अमेरिकन हवाई दलाने Typhoon Haiyan मधून सुटका केलेल्या Philippinian नागरिकांचा जुनाच फोटो पसरवला

सोशल मीडियावर एका फोटोत IAF C17 Airlifts द्वारा अफगानिस्तानातून भारतीय नागरिकांना आणतानाचा असल्याचा दावा होतो आहे. परंतू, हा दावा चुकीचा असून हा जुना फोटो आहे. जाणून घ्या या फोटोचे वास्तव.

Fake News on Indians airlifted from Kabul (Photo Credits: Twitter)

इंटरनेट आणि सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात शोकडोंच्या संख्येने काही नागरिक विमानात दाटीवाटीने बसलेले दिसतात. हा फोटो IAF C17 Airlifts द्वारा अफगानिस्तानातून भारतीय नागरिकांना आणतानाचा असल्याचा दावा होतो आहे. परंतू, हा दावा चुकीचा असून हा जुना फोटो आहे. तसेच, Typhoon Haiyan मध्ये अडकलेल्या फिलीपाईन (Philippinian) नागरिकांची अमेरिकेच्या हवाई दलाने (US Air Force) सुटका केली. त्या वेळचा असल्याचे पुढे आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोची सत्यता लेटेस्टलीने पडताळून पाहिली. लेटेस्टलीच्या पडताळणीत आढळून आले की, सोशल मीडयावर केला जाणारा फोटोबाबतचा दावा खोटा आहे. अफगानिस्तानमध्ये तालीबानने कब्जा मिळविल्यानंतर भारतीय नागरिकांना परत आणण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यातील अनेक भारतीयांना केंद्र सरकारच्या पुढाकाराने परतही आणण्यात आले. या नागरिकांना भारतीय हवाई दलाच्या IAF C17 विमानाने परत आणतानाचाच हा फोटो असल्याचे सोशल मीडियावर दावा केला जात आहे. परंतू, वास्तव वेगळेच आहे. (हेही वाचा, All About Taliban: तालिबान काय आहे? तालिबानी संघटन, स्थापना, ओसामा बीन लादेनची एण्ट्री आणि अफगान जनतेची फरफट)

फोटोमागचे वास्तव काय?

लेटेस्टलीच्या पडताळणीत पुढे आलेले वास्तव असे की, हा फोटो खरा असला तरी तो 2013 मधला म्हणजे जवळपास 8 वर्षे जुना आहे. या फोटोचा आणि अफगानिस्तान, भारतीय नागरिक आणि IAF C17 विमानाशी काहीही संबंध नाही. Haiyan चक्रीवादळात काही फिलीपाईनचे नागरिक अडकले होते. त्या वेळी अमेरिकी हवाई दलाने बचाव मोहीम राबवली होती. या वेळी एका मोठ्या विमानात अत्यंत जागा मिळेल तिथे दाटीवाटे बसलेल्या नागरिकांचा हा फोटो आहे. या नागरिकांना विमानातून सुरक्षीत ठिकाणी हालवण्यात आले.

ट्विट

ट्विटरवर एका युजरने हा फोटो शेअर करत धादांतपणे म्हटले आहे की, काबूल विमानतळावरुन भारतीय नागरिकांना घेऊन IAF C17 airlifts उड्डाण करताना. या विमानात 800 नागरिक असल्याचा दावा करत हा एक विक्रमच असू शकतो असेही हा युजर्स म्हणतो. परंतू या युजर्सचा हा दावा धादांत खोटा असल्याचे स्पष्ट होते. सोशल मीडियावर इतरही काही अनेक युजर्सनी हा फोटो शेअर करत वेगवेगळे दावे केले आहेत.

ट्विट

ट्विट

दरम्यान, अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर झालेल्या अराजकतेदरम्यान भारताने मंगळवारी (17 ऑगस्ट) अफगाणिस्तानमधील मुत्सद्द्यांसह 150 हून अधिक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान काबूल विमानतळावरून उड्डाण घेऊन गुजरातमधील जामनगर एअरबेसवर उतरले. त्या आधी सी -17 ग्लोबमास्टर विमानाने रविवारी सुमारे 180 भारतीयांना बाहेर काढले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now