Fact Check: 1 मे पासून लॉकडाऊन ची नवी नियमावली जारी? व्हायरल होणाऱ्या मेसेजचे BMC ने दिले स्पष्टीकरण

त्यात 1 मे पासून संपूर्ण लॉकडाऊन असून मुंबई पालिकेने त्यासंबंधित नवी नियमावली जारी केल्याचे म्हटले आहे. बीएमसीच्या लोगोसह हा मेसेज पसवला जात आहे.

Fake News | (Photo Credits: BMC/Twitter)

राज्यासह मुंबई (Mumbai) मध्ये कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग दिवसागणित वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांचा कालावधी 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहेत. त्यावरुन आता एक मेसेज सोशल मीडिया माध्यमात वेगाने पसरत आहे. त्यात 1 मे पासून संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) असून मुंबई पालिकेने त्यासंबंधित नवी नियमावली जारी केल्याचे म्हटले आहे. तसंच अत्यावश्यक सेवांसह इतर महत्त्वाची दुकाने ठराविक वेळेत खुली राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  बीएमसीच्या (BMC) लोगोसह हा मेसेज पसवला जात आहे. (कोविड-19 वर औषध सापडल्याचा एका व्यक्तीचा व्हिडिओद्वारे दावा; PIB Fact Check ने सांगितले सत्य)

सध्याच्या कठीण काळात या मेसेजमुळे लोकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीएमसीने ट्विट करत मेसेज मागील सत्याचा उलघडा केला आहे. हा मेसेज फेक असून अशा प्रकारचे कोणतेही नियम बीएमसीने जारी केलेले नाहीत, असे बीएमसीने स्पष्ट केले आहे. बीएमसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, "समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली ही माहिती खोटी असून बृ.म.न.पा.ने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत. राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वेच लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी."

BMC Tweet:

तसंच अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि त्या पसरवू नका, असे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे. कोविड-19 संकटकाळात अशा प्रकारचे अनेक खोटे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवले जातात. मात्र त्यामागील सत्य जाणून न घेता विश्वास ठेवल्याने दिशाभूल किंवा फसवणूक होऊ शकते. त्यामुळे संबंधित अधिकृत संकेतस्थळावरुन कोणतीही माहिती जाणून घेणे योग्य ठरेल.