Fact Check: वैभव लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत मोदी सरकार SBI बॅंकेच्या माध्यमातुन महिलांंना देतंंय 4 लाखाचं कर्ज? PIB ने सांगितलं सत्य
काही दिवसांंपासुन एक पोस्ट सगळ्या सोशल मीडिया साईट्स वर पाहायला मिळतेय या मध्ये मोदी सरकार व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांंना तब्बल 4 लाखाचं कर्ज (Loan) देणार असल्याचा दावा केला गेलाय.तुम्हीही अशी काही पोस्ट पाहिली असेल तर ती शेअर करण्याआधी PIB ने यासंदर्भात दिलेलं स्पष्टीकरण एकदा आवश्य वाचा
अलिकडे प्रत्येक दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातुन एक नवी पोस्ट व्हायरल होत असते, अनेकजण तर कोणतीही पडताळणी न करता या पोस्टवर विश्वास ठेवतात. मागील काही दिवसांंपासुन अशीच एक पोस्ट सगळ्या साईट्स वर पाहायला मिळतेय या मध्ये मोदी सरकार व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांंना तब्बल 4 लाखाचं कर्ज (Loan) देणार असल्याचा दावा केला गेलाय. हे कर्ज वैभव लक्ष्मी योजनेच्या (Vaibhav Laxmi Yojna) अंतर्गत दिले जाईल आणि त्यासाठी महिलांंना स्टेट बॅंक ऑफ इंंडिया (SBI) मध्ये कर्जासाठी अर्ज करता येणार आहे असेही या पोस्ट मध्ये सांंगण्यात आले आहे. तुम्हीही अशी काही पोस्ट पाहिली असेल तर ती शेअर करण्याआधी PIB ने यासंदर्भात दिलेलं स्पष्टीकरण एकदा आवश्य वाचा. Fact Check: कोरोनामुळे आर्थिक संकट असताना शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फी साठी मोदी सरकार देणार 11 हजार रुपये? PIB ने केला खुलासा
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने वैभव लक्ष्मी नामक कोणतीही योजनाच सुरु केलेली नाही तसेच कर्जाच्या बाबत सुद्धा कोणतीही अधिकृत घोषणा सरकार कडुन झालेली नाही, महिला तसेच नवउद्योजकांंना मदतीसाठी कर्ज उपलब्ध करुन देणार्या अनेक योजना सुद्धा अस्तित्वात आहेत मात्र ही 4 लाखाची कर्ज योजना संपुर्णतः फोल आहे.
PIB Tweet
दरम्यान, केंद्र सरकारच्या अधिकृत अशा कोणत्याच मंंत्रालयीन वेबसाईट वर या योजनेचा उल्लेखही नाहीये, त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवु नकाच तसेच अशा पोस्ट शेअर करणे सुद्धा टाळा. अशा प्रकारच्या अनेक व्हायरल पोस्ट आपण रोज पाहतो पण त्यावर विश्वास ठेवण्याआधी निदान त्या संबंधित अधिकृत सरकारी साईटस किंंवा पीआयबी चे अकाउंट तपासुन पाहा.