Fact Check: कोरोना व्हायरसची pH Value 5.5-8.5 असल्याने लिंबू, आंबा, संत्री खाऊन होणार उपचार? Corona वर मात केलेल्या रुग्णाचा दाखला देत व्हायरल होणार्‍या मॅसेज मागील सत्य जाणुन घ्या

लेटेस्टली ने या दाव्याचा तपास घेतला असता कोणत्याही अधिकृत वैद्यकीय संस्थेने किंवा माध्यमांनी सुद्धा या विषयीची पुष्टी केलेली आढळत नाही.

Screenshot of fake WhatsApp value (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे सर्वांना घरी बसावे लागले असताना सोशल मीडियावर फॉर्वर्डस आणि व्हायरल मॅसेजना अक्षरशः तुफान आले आहे. यातीलच एक नवा मॅसेज कोरोना व्हायरसची pH Value सांगत त्यानुसार कोणती फळे खाल्ल्याने यावर उपचार करता येतील याची माहिती देत आहे.  विशेष म्हणजे  हा मॅसेज कोरोनाचा उपचार घेउन  बरे झालेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे.  हा मॅसेज किती खरा आहे हे आपण पाहणार आहोत पण त्या आधी पहा काय आहे हा व्हायरल मॅसेज..

 

रुग्णालयातून बरे झालेल्या कोरोना रूग्णाची माहिती.

दररोज आम्ही तिथे घेत होतोः

1. व्हिट-सी 1000

2. व्हिटॅमिन- ई

3.10.00 - 11.00 am

सूर्य प्रकाश घ्या 15-20 मि.

4. रोज एक अंडी.

5. भरपूर विश्रांती घ्या.

किमान आवश्यक 7-8 तास

6. दररोज 1.5 लीटर पाणी प्या. आणि प्रत्येक जेवणात गरम (थंड नाही) प्यावे.

आम्ही इस्पितळात हे केले-

कोरोनासाठी पीएच 5.5 ते 8.5 असू शकतो.

आम्ही विषाणूशी लढण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी काय केले ते वरील पीएच स्तरावर अधिक अल्कधर्मी अन्न खाणे आहे:

त्यापैकी काही आहेत:

* लिंबू - 9.9 पीएच

* कपूर - 8.२ पीएच

* अ‍व्होकाडो - 15.6 पीएच

* लसूण- 13.2 पीएच

* मॅंगो - 8.7 पीएच

* टेंजरिन- 8.5 पीएच

* अननस - 12.7 पीएच

* पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड - 22.7 पीएच

* संत्रा - 9.2 पीएच

आपल्यास कोरोनाव्हायरस आहे हे कसे कळेल?

1. घसा खोव खोवणे.

2. घसा कोरडा पडणे.

3. कोरडा खोकला.

4. उच्च तापमान.

5. श्वसन समस्या.

6. वास व चव न समजणे.

वरीलपैकी काही आढळल्यास त्वरीत गरम पाण्यात लिंबू टाका आणि प्या.

फक्त ही माहिती स्वत:कडे ठेवू नका.

कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा. सावधगिरी बाळगा.

दरम्यान ही यादी आणि त्यात सांगण्यात आलेली पीएच व्हॅल्यूए चुकीची असल्याचे समजत आहे. त्यामुळे कुठेतरी एकूणच आकडेवारीत गल्लत असल्याने या दाव्याची सत्यता शून्य आहे हे म्हणता येईल.

या फळांची योग्य pH Value जाणुन घ्या

फळ pH Value
लिंबु 2.2-2-4
 लाइम 1.8 - 2.0
 अ‍ॅवोकाडो 6.3 - 6.6
लसुण 5.8
 आंंबा 5.8 - 6.0
 कीनू 3.9
 अननस 3.20-4.00
 संत्री 3.0 - 4.0

 

दरम्यान याच मॅसेज मध्ये आपल्यास कोरोनाव्हायरस आहे हे कसे ओळखावे याबद्दल ही सांगण्यात आले आहे. कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास  त्वरीत गरम पाण्यात लिंबू टाका आणि प्या असा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे, मात्र यावर आपण अवलंबून न राहता काहीही त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असा सल्ला आम्ही देऊ.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif