Fact Check: कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर रस्त्यावर होतोय उपचार? इटली मधील व्हायरल फोटोचे सत्य जाणून घ्या
या फोटोमध्ये काही रुग्ण हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले असून हे बेड भर रस्त्यात ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. हे रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे देखील या फोटोखाली लिहिण्यात आले आहे. याची पडताळणी केली असताना हे फोटो जरी खरे असले तरी हे रुग्ण कोरोनाचे आहेत हे कॅप्शन चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) जगा वरचा वाढता धोका आटोक्यात येणे येत्या काही काळासाठी तरी मुश्कीलच भासत आहे. जगभरात चीन नंतर कोरोनाचा सर्वात जास्त फटका हा इटली या देशाला बसला आहे, किंबहुना चीन (China) मध्ये व्हायरस निर्माण होऊनही जितकी भीषण परिस्थिती उद्भवली नाही त्याहून कित्येकपट गंभीर परिणाम इटली (Italy) या देशावर झाला आहे. हजारो रुग्ण आणि तब्बल 7 हजार 500 मृत्यू यामुळे अगोदरच इटली मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात भर म्हणून सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल (Viral Photo) होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये काही रुग्ण हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले असून हे बेड भर रस्त्यात ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. हे रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे देखील या फोटोखाली लिहिण्यात आले आहे. ज्या आजारामुळे लोकांना स्वतःच्या घरातील मंडळींना सुद्धा भेटू दिले जात नाही त्यांच्यावर भर रस्त्यात उपचार केले जात आहेत हे फोटो पाहून साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याची पडताळणी केली असताना हे फोटो जरी खरे असले तरी हे रुग्ण कोरोनाचे आहेत हे कॅप्शन चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
वास्तविक 22 मार्च रोजी Croatia येथे आलेल्या भूकंपाच्या वेळेचे हे फोटो आहेत. या फोटोमध्ये काही रुग्ण ब्लॅंकेट गुंडाळून रस्त्याच्या कडेला बसलेले सुद्धा दिसून येत आहेत, या रुग्णांसाठी हॉस्पिटल मध्ये जागा नसल्याने त्यांना रस्त्यावर बसवण्यात आल्याचे या फोटो खालील कॅप्शन मध्ये सांगण्यात आले आहे. Fact Check: कोरोनाच्या भीतीने बेल्जीयम मध्ये Group Sex वर सक्तीची बंदी? जाणून घ्या सत्य
पहा ट्विट
दरम्यान, या फोटोची कोणत्याही अधिकृत माध्यमातून किंवा अधिकार्यांकडून पुष्टी झालेली नाही त्यामुळे साहजिकच हे रुग्ण सुद्धा रत्यावर का ठेवण्यात आले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हे रुग्ण कोरोनाचे नाहीत हे मात्र अगदी स्पष्ट आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून या गंभीर परिस्थितीत लोकांना घाबरवण्याचे काम करू नये असे आमच्या वतीने सुद्धा आपल्याला आवाहन आहे.