Fact Check: 18 वर्षांवरील व्यक्ती 24 एप्रिल पासून करु शकतात COVID19 Vaccine साठी रजिस्ट्रेशन? PIB ने केला खुलासा
देशात कोरोना व्हायरस संसर्गाचा कहर पाहायला मिळत असताना 18 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची परवानगी देऊन केंद्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा कहर पाहायला मिळत असताना 18 वर्षांवरील व्यक्तींना लस (Vaccine) देण्याची परवानगी देऊन केंद्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र त्यावरुनही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड-19 लसीच्या रजिस्ट्रेशन (Covid-19 Vaccine Registration) तारखेबद्दल संभ्रम निर्माण करणारे काही रिपोर्ट्ससमोर आल्यामुळे नागरिक पॅनिक झाले आहेत. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने ट्विटच्या माध्यमातून हा गोंधळ दूर केला आहे. (Fact Check: कच्चा कांदा आणि सैंधव मीठाच्या सेवनाने कोविड-19 होईल बरा? जाणून घ्या PIB चा खुलासा)
18 वर्षांवरील नागरिक कोविड19 लसीसाठी 24 एप्रिलपासून रजिस्ट्रेशन करु शकतात, असा दावा मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. यावर स्पष्टीकरण देताना पीआयबीने लिहिले, "हा दावा फेक असून रजिस्ट्रेशन प्रोसेस 28 एप्रिलपासून CoWIN आणि Aarogya Setu अॅपच्या माध्यमातून सुरु होणार आहे. तसंच 1 मे पासून लसीकरणाला सुरुवात होईल."
Fact Check By PIB:
कोरोना व्हायरस संकटकाळात फेक न्यूज व्हायरल होण्याचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे आधीच चितेंत असलेल्या नागरिकांचा गोंधळ उडतो. अनेकदा भीतीचे वातावरण निर्माण होते. दिशाभूल होऊन फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे फेक न्यूज ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच कोणत्याही प्रकारच्या माहितीवर विश्वास न ठेवता त्यासंबंधित वेबसाईटला भेट देऊन त्याबद्दल खातरमजा करुन घेणे योग्य ठरेल.