Exclusive! उबेर ड्रायव्हर विनोद शर्मा स्वत:चा म्यूझिक अल्बम काढण्यासाठी साठवतोय पैसे, स्वत: रचलेलं गाणं कुमार सानू यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याची इच्छा

लेटेस्टली चे प्रतिनिधी रजत त्रिपाठी (Rajat Tripathi) यांनी उबेर ड्रायव्हर विनोद शर्मा (Vinod Sharma) यांच्याशी केलेली एक्सक्लुसिव्ह मुलाखत....

Vinod Sharma IV (Photo Credits: YouTube/Instagram)

लेटेस्टली चे प्रतिनिधी रजत त्रिपाठी (Rajat Tripathi) यांनी उबेर ड्रायव्हर विनोद शर्मा (Vinod Sharma) यांच्याशी केलेली एक्सक्लुसिव्ह मुलाखत.... गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट हे स्ट्रगलर करणा-या गायकांसाठी प्रसिद्धीचे उत्तम माध्यम बनले आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे रेल्वे स्टेशनवर गाणारी रानू मंडल. जिच्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओने तिला एवढी प्रसिद्धी मिळाली की काही दिवसांतच तिने प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया सोबत गाणे गायले. त्यातच आता वर्णी लागलीय ती लखनऊमधील उबेर चालक विनोद शर्मा याची. आपल्या गाडीत बसणा-या प्रवाशाला आपल्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध करणा-या विनोदचे 'आशिकी' चित्रपटातील नजर के सामने हे गाणे खूपच व्हायरल झाले आहे. या गाण्याने आणि मुळात त्याच्या आवाजाने लवकरच त्याचेही नशीब बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याच्या स्वप्नाविषयी आणि त्याच्या भविष्यातील वाटचालीविषयी जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रजत त्रिपाठी यांनी केलेली ही खास बातचीत..

विनोद म्हणाला, "माझे सध्याचे यश हे माझ्या देवाचे आशीर्वाद आहेत. मी 3-4 वर्षांचा असल्यापासून गात आहे. हळूहळू या आवडीचे कधी व्यसन लागलं हे मला कळलच नाही. 2007 मध्ये रेडिओ चे ऑडिशन दिले होते आणि माझे नशीब की काय माझी त्यात निवडही झाली. माझी आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसल्यामुळे मला शास्त्रीय संगीत शिकता आले नाही.

हेही वाचा- लखनऊ: Uber चालकाने गायलेलं आशिकी सिनेमातील 'नजर के सामने' गाणं ऐकून व्हाल थक्क; रानू मंडल नंतर आणखीन एक सोशल मीडिया स्टार (Watch Video)

विनोदचे कुटूंब आणि त्याचे शेजारी त्याच्या या आवडीला घेऊन म्हणावे तितके खूश नाही. त्यामुळे अनेकदा तो लपून-छपून गाण्याचा रियाज करायचा. मात्र आता त्याचे लग्न झाले असून त्याला 2 मुले आहेत. पण आवड जोपासणे ही अशी गोष्ट आहे की ज्याचे एकदा व्यसन लागले की आपण मागे हटत नाही. मी आता गाडीही चालवतो. कधी कधी तर मी गाडी कमी चालवतो आणि गाणी जास्त गुणगुणतो. पण जर का मी एखादी खाजगी नोकरी करत असतो तर मी तिथे घुटमळलो असतो, तो म्हणाला.

अलीकडेच विनोदने त्याचे युट्यूब चॅनल सुरु केले आहे. त्यामुळे आपल्या गाडीत बसणा-या प्रत्येक प्रवाशाला तो आपले चॅनेल सब्सक्राइब करायला आर्वजून सांगतो. "मी रोज 10-12 लोकांना भेटतो. त्यांना त्यांच्या निश्चित स्थळी सोडतो आणि त्यांनी विनंती करतो की त्यांनी माझे गाणे ऐकावे." असेही विनोद म्हणाला.

विनोदने 'इंडियन आयडॉल' आणि 'सारेगमप' साठीही ऑडिशन दिले आहे. पण तिथे नशीब चमकले नाही. "तसही निवड होणे अथवा न होणे हे सुद्धा देवावर अवलंबून आहे. जेव्हा जेव्हा माझी निवड होत नाही, तेव्हा तेव्हा मी आणखी रियाज करतो, प्रयत्न करतो. जेणे करुन मी स्वत:ला आणि माझ्या मुलाला अभिमानाने सांगू शकेल की, मी ऑडिशन साठी मनापासून प्रयत्न केले." असं विनोद सांगतो.

त्याचे भविष्यातील प्लान्स खूपच भन्नाट आहेत. "सध्या मी पैसे साठवत असून मला माझा म्यूझिक अल्बम लाँच करायचा आहे, ज्यात मी तयार केलेली गाणी असतील." त्यात सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी आपला आवाज द्यावा अशी माझी इच्छा आहे असेही तो म्हणाला.