महाराष्ट्र सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करताच सोशल मिडियावर मजेशीर मीम्सचा पाऊस, वाचा भन्नाट जोक्स
मात्र हा निर्णय बदलून आता त्यांच्याही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) व शिक्षण विभागाचे अन्य अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात आली. 30 मे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आणि मग 31 मे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह मध्ये याची घोषणा केली. यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांवर पास करण्यात येणार आहे. यामुळे सध्या सोशल मिडियावर मजेशीर मीम्सचा सुळसुळाटच सुरु झाला आहे.
मागील महिन्यात मुंबई विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा होणार असे ठरवले होते. मात्र हा निर्णय बदलून आता त्यांच्याही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
यानिमित्ताने सोशल मिडियावर व्हायरल झालेले मीम्स
गरीब विद्यार्थी
राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 67,655 वर पोहोचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई-पुणे शहरात आढळून येत आहे.