पत्नी माहेरी गेल्यावर 'तो' ऑनलाईन गर्लफ्रेंड समोर झाला Nude.. नंतर जे घडले ते वाचून व्हाल थक्क

कालांतराने गोष्टी वाढत जाऊन त्यांनी व्हिडीओ कॉलवरच न्यूड होण्याचे ठरवले. यानुसार हा तरुण कपडे काढून महिलेला दाखवू लागला पण यावेळी महिलेने त्याचे कॉल रेकॉर्ड करून नंतर त्याला पैशासाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

. Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: File Image)

ऑनलाईन जगात सोशल मीडिया , डेटिंग अॅप (Dating App)  व तत्सम मार्गातून फ्लर्ट करणे अगदी कॉमन झाले आहे. अनेकदा दोन व्यक्तींच्या गप्पा मारण्यावरून सुरु होणारे हे संभाषण शारीरिक संबंध आणि त्यापुढे ही पोहचतात. ही वागणूक चूक किंवा बरोबर हे प्रत्येकाने ठरवायचे असते मात्र काही वेळा या ऑनलाईन डेटिंग (Online Dating) प्रकरणात व्यक्ती पुरता रोवला जाऊ शकतो. असाच एक प्रकार काडूगोडी येथे घडल्याचे समोर आले आहे. या भागातील एका इंजिनिअर तरुणाने आपली पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली असताना ऑनलाईन डेट  करण्यास सुरुवात केली, याच माध्यमातून ओळख झालेल्या एका महिलेशी त्याचा संपर्क वाढला आणि काही दिवसातच त्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल (Whatsapp Video Call)  करण्याचे ठरवले यावेळी सेक्स टॉक करत असताना गोष्टी वाढत जाऊन त्यांनी व्हिडीओ कॉलवरच न्यूड (Nude) होण्याचे ठरवले. यानुसार हा तरुण कपडे काढून महिलेला दाखवू लागला पण यावेळी महिलेने त्याचे कॉल रेकॉर्ड करून नंतर त्याला पैशासाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, तरुणाने या महिलेचे नाव प्रिया सिंह असे सांगितले आहे. या महिलेने आपण राजस्थानमधून असल्याचे सांगितले. काही दिवस या तरुणाने महिलेशी चॅट केल्यावर 28 ऑक्टोंबरला रात्री महिलेने स्वतःच त्याला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी तिने स्वतः सेक्स टॉकसाठी तयारी दर्शवत पुढाकार घेतला. तसेच कपडे काढून व्हिडिओत समोर येण्यास सांगितले. यावेळी उत्साहात येऊन या तरुणाने न्यूड पोझ केले पण तितक्यात प्रियाने फोन कट केला हीच गोष्ट तीन वेळा झाल्यावर तिने दुसऱ्या दिवशी त्याला आपण हे कॉल रेकॉर्ड केल्याचे सांगत पैसे मागण्यास सुरुवात केली. आपल्या सांगण्यानुसार पैसे न दिल्यास हा व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी सुद्धा तिने दिली होती.

न्युयॉर्क: हृतिक रोशन याच्यावर क्रश असणाऱ्या बायकोची हत्या करत नवऱ्याने सुद्धा गळफास लावत संपवले आयुष्य

दरम्यान, यामुळे तरुणाची पंचाईत झाल्याने त्याने सुरुवातीला तिला 30 हजार रुपये दिले मात्र कालांतराने तिची पैशाची रक्कम वाढू लागल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. तरुणाच्या तक्रारीनुसार, सध्या महिलेचा फोन बंद आहे. सायबर पोलिसांची मदत घेत हा तपास सुरु आहे.