Emirates Airline Viral Ad व्हिडीओ मध्ये खरंच Burj Khalifa वर महिला पोहचली होती का? नेटकर्‍यांच्या प्रश्नाचं एअरलाईन्स ने दिलं असं उत्तर (Watch Video)

दुबईत असणारी बुर्ज खलिफा ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत आहे. जमिनीपासून त्याची उंची 828 मीटर आहे. Nicole Smith-Ludvik या स्काय डायव्हरने खरंच त्याच्या टोकावर उभं राहून व्हिडिओ शूट केला आहे.

Emirates Airline Viral Ad | PC: Twitter/ Emirates Airline (Screengrab From Video)

युएई (UAE) मधील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी एमरिट्सच्या (Emirates Airline) जाहिरातीची सध्या सोशल मीडीयावर खूप चर्चा आहे. दुबईत बुर्ज खलिफाच्या (Burj Khalifa) टोकावर उभं राहून एक एअर हॉस्टेस प्रवाशांना एमरिट्स सोबत प्रवास करण्याचं आवाहन करत आहे असे या जाहिरातीत दाखवलं आहे. दरम्यान बुर्ज खलिफाच्या टोकावर खरंच ही महिला उभी होती का? असा प्रश्न काही नेटकर्‍यांना पडला आणि व्हिडीओ खरा की खोटा? यावरून चर्चा रंगायला लागली. ही ऑनलाईन चर्चा पाहून एमरिट्सनेच या प्रश्नाचं उत्तरं देण्यासाठी एक BTS Video शेअर करत लोकांच्या मनातील उत्सुकता संपवली आहे.

एमरिट्सने बीटीएस व्हिडिओ मध्ये खरंच केबिन क्रू बुर्ज खलिफाच्या टोकावर पोहचली होती असं स्पष्ट केले आहे. दरम्यान दुबईत असणारी बुर्ज खलिफा ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत आहे. जमिनीपासून त्याची उंची 828 मीटर आहे. दरम्यान इतक्या उंचीवर एका महिलेला घेऊन अ‍ॅड शूट करताना एमरिट्सने सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली होती.  एमिरिट्स च्या या जाहिरातीमध्ये Nicole Smith-Ludvik,ही एक प्रोफेशनल स्काय डायव्हर झळकली आहे. निकोल ही एमरिट्सची केबिन क्रु असल्याचं या जाहिरातीमध्ये दाखवलं आहे.

Emirates Airline ने शेअर केलेला BTS Video 

जाहिरात झळकलेल्या केबिन क्रु च्या भूमिकेतील प्रोफेशनल स्काय डायव्हर ची प्रतिक्रिया 

निकोलनेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून एमरिट्सच्या क्रिएटीव्हिटीचं कौतुक आहे. हा आतापर्यंत माझा मोस्ट अमेझिंग आणि एक्सायटिंग स्टंट होता अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच युके ने भारतीय प्रवासांवरील निर्बंध हटवत आता रेड लिस्ट मधून भारताला अंबर लिस्ट मध्ये समाविष्ट केल्याने भारतीय प्रवाशांनी एमरिट्सची निवड विमान प्रवासासाठी करावी असं आवाहन या एमरिट्सच्या नव्या जाहिरातीमधून करण्यात आलं आहे. नक्की वाचा: UK कडून भारतीय प्रवाशांवरील निर्बंधांमध्ये शिथिलता; लसीकरण पूर्ण झालेल्यांना 10 दिवस सक्तीच्या हॉटेल क्वारंटीन मधून मुभा .

सोशल मीडीयात थक्क करणारे अनेक व्हिडिओ थरकाप उडवणारे आहेत त्यामध्ये सध्या या एमरिट्सच्या जाहिरातीचा व्हीडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

IND vs PAK, ICC Champions Trophy 2025 5th Match Live Streaming In India: पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यात आमने-सामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

IND vs PAK, Champions Trophy 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? दूरदर्शन टीव्ही चॅनेलवरील प्रसारण कसे पहाल?

Lucknow Hospital: डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, पीडित कुटुंबाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण; लखनऊमधील घटना (Watch Video)

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Share Now