Snake In the Air Asia Plane: बाप रे बाप.. विमानत साप, एमरजन्सी लँडींग, प्रवाशांची बोबडीच वळली
एअर एशीया (AirAsia) कंपनीच्या विमानात हा प्रकार घडला. हवेत झेपावलेल्या एअर एशियाच्या विमानात चक्क भला मोठा साप (Snake Found In Plane) आढळून आला. हा साप (Snake) पाहून प्रवासी मोठ्या प्रमाणावर घाबरले. त्यामुळे विमानाचे एमरजन्सी लँडींग करावे लागले. ही घटना मलेशिया येथे घडली.
विमानाचे एमरजन्सी लँडींग (Emergency Landing Of Plane) हा प्रकरण नवा नाही. आजवर अनेक वेळा विमानाचे एमरजन्सी लँडींग करण्यात आले आहे. सापामुळे विमानाचे लँडींग झाल्याचे आपण ऐकले आहे का? वास्तवात असे घडले आहे. एअर एशीया (AirAsia) कंपनीच्या विमानात हा प्रकार घडला. हवेत झेपावलेल्या एअर एशियाच्या विमानात चक्क भला मोठा साप (Snake Found In Plane) आढळून आला. हा साप (Snake) पाहून प्रवासी मोठ्या प्रमाणावर घाबरले. त्यामुळे विमानाचे एमरजन्सी लँडींग करावे लागले. ही घटना मलेशिया येथे घडली.
प्राप्त माहतीनुसार विमानात एकूण 5748 इतके प्रवासी होते. हे विमान क्वालालंपूर येथील तवाई येथून हवेत झेपावले होते. विमानात केबीन लाईटमध्ये साप सरपटत असल्याचे पाहायला मिळाले. विमानात भलामोठा साप असून त्याला पाहून प्रवासी घाबरल्याचे समजताच पायलटने विमानाचे एमरजन्सी लँडींग करण्याचा निर्णय घेतला. विमान कंपनीने घडल्या प्रकाराबद्दल सांगताना म्हटले, विमानात साप होता. मात्र, त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. (हेही वाचा, Cubs Of Tiger From Melghat Video: मेळघाटात वाघाचे गोंडस बछडे घालतायत पर्यटकांना भूरळ; पाहा 'हा' सूपर क्यूट व्हिडिओ)
विमनाचे लँडींग झाल्यानंतर साप पकडण्यात आला. त्यानंतर विमानाने पूर्ववत लँडींग केले. दरम्यान, सापाच्या प्रजातीबद्दल माहिती मिळू शकली नाही. या आधी मॅक्सीको येथेही अशीच काहीशी अजब घटना पाहायला मिळाली होती. या ठिकाणीही एक विषारी साप विमानात आढळून आला होता. ज्यामुळे विमानाचे एमरजन्सी लँडींग करावे लागले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)