Elon Musk In Desi Look: एलन मस्क देसी पोषाखात, SpaceX च्या मालकाचा Artificial intelligence तंत्रज्ञान निर्मित फोटो व्हायरल
ज्यात एलोन मस्कला भारतीय नवरदेव म्हणून दाखवले गेले आहे. मस्क यांनी सोनेरी शेरवानी परिधान केली आहे आणि खास देसी सोहळ्यात असतो तसा वरात डान्स करताना ते दिसातत. AI-निर्मित चित्रांमध्ये त्याला लग्नातील पाहुण्यांसोबत नाचताना, शाही पोझ देताना आणि घोड्यावर स्वार होतानाही दाखवण्यात आले आहे.
Elon Musk In an Indian Groom Dress: एलन मस्क ( Elon Musk) आणि चर्चा, वाद हे समिकरण आता नवे नाही. आपल्या प्रत्येक कृतीमुळे एलन मस्क हे जगभरात चर्चेचा विषय ठरतात. आताही एलन मस्क हे चर्तेत आले आहेत. पण, त्यासाठी त्यांची कोणतीच कृती कारण ठरली नाही. पण, एआय (AI) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) तंत्रज्ञानामुळे कमाल झाली आणि एलन मस्क चर्चेत आले. मस्क यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. ज्या फोटोमध्ये एलन मस्क हे चक्क भारतीय पोषाखात पाहायला मिळत आहेत. मस्क यांचा देसी लूक पाहून लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
SpaceX मालकाचे AI टेक्नॉलाजी वापरु हे चित्र तयार केले गेले आहे. ज्यात एलोन मस्कला भारतीय नवरदेव म्हणून दाखवले गेले आहे. मस्क यांनी सोनेरी शेरवानी परिधान केली आहे आणि खास देसी सोहळ्यात असतो तसा वरात डान्स करताना ते दिसातत. AI-निर्मित चित्रांमध्ये त्याला लग्नातील पाहुण्यांसोबत नाचताना, शाही पोझ देताना आणि घोड्यावर स्वार होतानाही दाखवण्यात आले आहे.
गमतीचा भाग असा की, इलॉन मस्कने स्वत: या प्रतिमेची दखल घेत ते आवडल्याचे म्हटले आहे. SpaceX चे CEO मिडजर्नीने तयार केलेली प्रतिमा पाहून मस्क चांगलेच खूश झाले आहेत. (हेही वाचा, Elon Musk World's Richest Person: एलन मस्क पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती आहे संपत्ती? घ्या जाणून)
दरम्यान, मस्क यांची प्रतिमा असलेल्या या ट्विटर पोस्टला आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि देसी ट्विटरही उत्साही झाले आहे. अनेकांनी सुचवले की इलॉन मस्क भारतीय नवरदेव म्हणून छान दिसेल.
ट्विट
ट्विट
इलॉन मस्क हे एक प्रसिद्ध उद्योजक आणि व्यवसायिक आहेत. जे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांच्या सहभागासाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म 28 जून 1971 रोजी प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिकेत झाला. टेस्ला, स्पेसएक्स, न्यूरालिंक आणि द बोरिंग कंपनी यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेसाठी मस्कला जगभरात ओळख मिळाली आहे.