Elephant Attack On Tourists Bus: प्रवाशांनी भरलेल्या बसवर हत्तीचा हल्ला, सोडेने उचलले वाहान (Watch Video)

हत्ती इतका आक्रमक झाला आहे की, आपल्या सोंडेच्या सहाय्याने त्याने चक्क बस उचलली ( Elephant Lifted Bus) आहे. अत्यंत थरारक आणि तितकीच भीतीदायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेला हत्तीने पर्यटकांच्या बसवर हल्ला (Elephant Attack) केला असे म्हणावे की, नाही असा प्रश्न उपस्थित नक्कीच होऊ शकतो.

Elephant Attack | Photo Credit- X)

Elephant Viral Video: दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) जंगलातील मदमस्त हत्तीचा एक भीतीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जातो आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, जंगल सफारीवर असलेल्या काही पर्यटकांच्या एका वाहनाला हत्ती पाठिमागे दाबतो आहे. हत्ती इतका आक्रमक झाला आहे की, आपल्या सोंडेच्या सहाय्याने त्याने चक्क बस उचलली ( Elephant Lifted Bus) आहे. अत्यंत थरारक आणि तितकीच भीतीदायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेला हत्तीने पर्यटकांच्या बसवर हल्ला (Elephant Attack) केला असे म्हणावे की, नाही असा प्रश्न उपस्थित नक्कीच होऊ शकतो. कारण, मानवच वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात प्रवेश करतो. त्यामुळे या प्राण्यांना मानवाच्या संपर्कात येण्याशिवाय दुसरा पर्यायच राहात नाही.

हत्तीने उचलली बस

दक्षिण आफ्रिकेतील पीलानेसबर्ग राष्ट्रीय उद्यानात (Pilanesberg National Park) ही घटना सोमवारी एका प्रवासी वाहनासोबत घडली. एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना घडली तेव्हा मीनी बसमध्ये जवळपास 22 प्रवासी होते. व्हिडिओत दिसते की, प्रवाशांची मिनी बस पाहून हत्ती आक्रमक होतो आणि वाहनावर चाल करतो. हत्तीचे अनपेक्षीत वर्तन पाहून बसचा चालक खाली उतरतो आणि हत्तीला दूर जाण्यासाठी संदेश पाठवतो, तसेच बसच्या पत्र्यावर विशिष्ट आवाज करतो. ज्यामुळे हत्ती निघून जातो. हत्तीचा हल्ला होता पण प्रवासी सुखरुप बचावतात. (हेही वाचा, Elephant Attack: चारा घालणाऱ्या महिलेवर हत्तीचा हल्ला (Watch Video))

व्हिडिओ

हत्तीचा रुद्रावतार पाहून उद्यानातील कर्मचारीही घाबरले

आफ्रिकेच्या राष्ट्रीय उद्यानातील अतीशय धक्कादायक अशी ही घटना हेन्ड्री ब्लोम यांनी चित्रीत केली आहे. हे वृत्त देणाऱ्या माध्यमसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटले की, उद्यानात घडलेली ही घटना पाहून आम्ही खूप घाबरलो होतो. खास करुन वन्य प्राणी बसमधील पर्यटकांवर हल्ला करणार असे आम्हास वाटू लागले होते. पण सुदैवाने त्याने तसे काही केले नाही सर्व पर्यटक सुरक्षीत राहिले. आम्हाला काही क्षणांसाठी वाटलेले आता ते मरणार बहुतेक. (हेही वाचा, Viral Video: हत्तीने रस्त्यावर केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीही व्हाल गजराजचे चाहते, पाहा व्हिडीओ)

व्हिडिओ

दरम्यान, हत्तीने हल्ला केला तेव्हा बसमध्ये असलेल्या आणि घाबरलेल्या पर्यटकांचा आणखी एक व्हिडिओ पुढे आला आहे. ज्यामध्ये हत्तीचा रुद्रावतार पाहून बसमधील पर्यटक किंचाळत आणि ओरडत आहेत. आत्मसंरक्षणासाठी ते बसमध्ये खाली लोळण घेत आहेत. टूर कंपनी मॅकन्क्वे गेम ट्रॅकर्सचे फील्ड ऑपरेशन मॅनेजर पोंचो मोगोदिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हत्ती आणि पर्यटक परस्परांच्या खूपच जवळ आले. त्यातच पर्यटकांना हत्तीचे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान, व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते उद्यानात फिरताना वन्य प्राण्यांच्या आणि पर्यटकांच्याही सुरक्षेची योग्य काळजी घ्यायला हवी. आपल्या आनंदासाठी प्राण्यांना त्रास देणे योग्य नसल्याचेही काही वापरकर्त्यांनी म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now