Durex Condom ने हटके जाहिरातीतून दिला नवीन वाहतूक नियम पाळण्याच्या सल्ला, नेटकऱ्यांनी केली प्रशंसा

यामधून 'Ride Safe' हा हटके मॅसेज देण्यात आला आहे. यातून सुरक्षित सेक्सची प्रसिद्धी करत केलेल्या या जाहिरातीची नेटकऱ्यांनी प्रशंसा केली आहे.

Durex India Ad on New Traffic Rules (Photo Credits: @DurexIndia/ Twitter)

सद्य घडीला नवीन वाहतूक नियम हा चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. केंद्र सरकारने मोटार वाहतूक कायद्यातील  (Motor Vehicle Amendment Act) दुरुस्ती सादर करत 1  सप्टेंबर पासून नवे नियम जाहीर केले होते. या नियमांनुसार रस्ते व वाहतूक सुरक्षेला धाब्यावर बसवणाऱ्यांना रोख लावण्यासाठी दंड व शिक्षेत बरीच वाढ केली होती. या नियमासाठी विविध स्तरावरून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत होत्या. या सगळ्यात आता ड्युरेक्स कॉन्डोम (Durex Condom) कंपनीने देखील सरकारच्या या नव्या धोरणाची पाठराखण करत एक मजेशीर जाहिरात शेअर केली आहे. यामधून 'Ride Safe' हा हटके मॅसेज देण्यात आला आहे. तुमची एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठा दंड भरायला लावू शकते या स्वरूपात ही जाहिरात आहे. यासोबतच फसव्या चुका टाळा असे म्हणत ड्युरेक्सने ही जाहिरात शेअर केली आहे. ड्युरेक्सच्या या हटके व क्रिएटिव्ह पद्धतीची नेटकऱ्यांनी  देखील स्तुती केली आहे. काहींनी तर यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हा संदेश देताच आला नसता असे म्हणत प्रशंसा केली आहे.

 Durex Condom जाहिरात

आता ही जाहिरात बघून वरवर जरी आपण ट्रॅफिक नियमांशी संबंध जोडत असलो तरी, यामागे ड्युरेक्सने आपल्या ब्रॅण्डची देखील प्रसिद्धी केली आहे. ज्याप्रमाणे रस्त्यात सुरक्षित ड्राइव्ह करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे कॉन्डोम वापरून सुरक्षित सेक्स करा असा छुपा अजेंडा आहे. (Porn Industry करियर म्हणून निवडल्यावर Mia Khalifa हिस कुटुंबाकडून आला 'हा' अनुभव; केला धक्कादायक खुलासा)

दरम्यान, यापूर्वीही ड्युरेक्सने नरच आपली हटके अंदाजात विविध भविष्यानावर भाष्य केले आहे. काही दशकांपासून कार्यरत असणाऱ्या या कंपनीने सुरक्षित सेक्सच्या मुद्द्याला चर्चेत आणून आपल्या ब्रँडची जाहिरात केली आहे, तसेच सेक्स या मुद्द्याशी जोडला गेलेला संकोच दूर करण्यासही मदत केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif