दुबई येथे 9 वर्षीय भारतीय मुलीने जिंकली 10 लाख डॉलरची लॉटरी
दुबई (Dubai) ड्युटी फ्री मिलेनियम मिलियनेयर लॉटरीमध्ये एका 9 वर्षीय भारतीय मुलीला 10 लाख डॉलर्सची लॉटरी लागली आहे.
दुबई (Dubai) ड्युटी फ्री मिलेनियम मिलियनेयर लॉटरीमध्ये एका 9 वर्षीय भारतीय मुलीला 10 लाख डॉलर्सची लॉटरी लागली आहे. तर 6 वर्षापूर्वी याच मुलीने ह्याच लॉटीरमधून एक लक्झरी कार जिंकली होती. खलीज टाईम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार, एलिजा एम असे मुलीचे नाव असून ती ए ग्रेड शाळेतील विद्यार्थिनी आहे. जॅकपॉटची मानकरी ठरली असून तिच्या तिकिट क्रमांक 0333 आहे.
एलिजा हिचे वडील मुंबईचे असून सध्या दुबई येथे राहतात. त्यांनी असे सांगितले की, 2004 पासून ते सातत्याने या लॉटरीच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. तर वृत्तपत्रांनी असे सांगितले की, त्यांचा लकी क्रमांक 9 आहे. एलिजाच्या वडिलांनी तिच्या नावावर लॉटरीचे तिकिट ऑनलाईन काढण्याचे ठरविले.(हेही वाचा-गजब! भारतीय तरुणाला दुबई येथे तब्बल 19 कोटींची लॉटरी)
तर दुबईतल्या लॉटरीची सुरुवात 1999 पासून झाली. त्यानंतर एलिजा ही 140 वी भारतीय नागरिक असून तिने दुबई येथे लॉटरी जिंकली आहे. यामध्ये दोन विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये लक्झरी मोटार बाईक देण्यात आली आहे.