क्रॉफर्ड मार्केट परिसरात स्टंटबाजी : नशेच्या धुंदीत स्टंट करण्याच्या नादात तरूण 20 फूटावरून कोसळला (Video)
स्टंट करताना 20 फूटावरून तो खाली पडला. त्यानंतर तात्काळ स्थानिकांनी जब्बरला जीटी रूग्णालयामध्ये दाखल केलं.
मुंबई लोकल्समधील स्टंटबाजी तुम्ही अनेकदा पाहिली असेल, बघितली असेल पण गुरूवारी दुपारी क्रॉफर्ड मार्केट परिसरात सुमारे 20 फूट उंचावर सिनेमात दाखवल्या जाणार्या स्टाईल मध्ये एका तरूणाने कॅबल वायर्सवरून एकीकडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. हा तरूण नशेत होता त्यामधूनच हा प्रयत्न करण्यात आला होता. असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे.
जब्बार जावेद अशरफ हा 38 वर्षीय तरूण आहे. स्टंट करताना 20 फूटावरून तो खाली पडला. त्यानंतर तात्काळ स्थानिकांनी जब्बरला जीटी रूग्णालयामध्ये दाखल केलं. जब्बारला काही फ्रॅक्चर्स आहेत तसेच सुदैवाने त्याच्या मेंदूला कोणतीच जबर दुखापत झालेली नाही. पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये तो जे जे फ्लायओव्हरवर कसा पोहचला ? हे ठाऊक नसल्याचे म्हटले आहे.
जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर जब्बार नशेचे पदार्थ घेत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं आहे. अपघाताच्या वेळेसही हा नशेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. उपचारानंतर जब्बार शुद्धित आला आहे. त्याच्या शरीरात दोन फ्रॅक्चर्स आहेत.