Pizza Delivery Viral Video: ट्रॅफीकमध्ये अडकला, संतापला, कारमध्ये पिझ्झा पोहोचवला; बंगळुरु येथील व्हिडिओ व्हायरल
बराच वेळ वाट पाहूनही वाहतूक कोंडी फुटण्याची चिन्हे दिसेनात. इतक्यात त्याला लागली प्रचंड भूक. पण आता अन्न मागवायचं कसं? पण पठ्ठ्याने धाडस केले आणि पिझ्झा ऑर्डर केला. काय गंमत. चक्क पिझ्झा (Domino's Pizza) डिलिव्हर झाला. होय.., डॉमिनोजचा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन हजर झाला.
बंगळुरु (Bangalore Traffic) येथील वाहतूक कोंडीचे एक अनोखे वैशिष्ट्य पुढे आहे. ते म्हणजे इथे एकदा का तुम्ही ट्रॅफीकमध्ये अडकलात की, काही काळासाठी ते तुमचे घर, ठिकाण आणि पत्रव्यवहाराचा पत्ताही असतो. होय, वाचून आश्चर्य वाटले ना? एका X हँडलवरुन करण्यात आलेल्या दाव्यानुसा, ऋषिवथ नावाचा एक व्यक्ती वाहतूक कोंडीत अडकला. बराच वेळ वाट पाहूनही वाहतूक कोंडी फुटण्याची चिन्हे दिसेनात. इतक्यात त्याला लागली प्रचंड भूक. पण आता अन्न मागवायचं कसं? पण पठ्ठ्याने धाडस केले आणि पिझ्झा ऑर्डर केला. काय गंमत. चक्क पिझ्झा (Domino's Pizza) डिलिव्हर झाला. होय.., डॉमिनोजचा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन हजर झाला.
तीस वर्षांचा ऋषिवथ X अकाऊंटवर 30 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर करत लिहितो. हा व्हिडिओ त्याने कारमध्ये बसून चित्रित केला आहे. ट्रॅफीकमध्ये अडकलो असताना मला भूक लागली. मी पिझ्झा ऑर्डर केला. डॉमिनोजचे दोन डिलिव्हरी स्कूटरवरुन बॉय आले. स्कूटर पार्क केली. त्यांनी मला (ऋषिवथ) पिझ्झा डिलिव्हर केला ते ही बंगळुरुच्या रस्त्यावर. वाहतूक कोंडी असताना. दरम्यान, व्हिडिओमध्ये एक महिला काहीतरी बोलत असतानाही ऐकू येते आहे.
व्हिडिओ
X युजर ऋशिवथ्सने पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा आम्ही बंगलोर चोक दरम्यान @dominos कडून ऑर्डर करण्याचे ठरवले. ते आमच्या थेट स्थानाचा मागोवा घेण्यासाठी (ट्राफिकमध्ये जोडलेल्या आमच्या यादृच्छिक स्थानापासून काही मीटर अंतरावर) आणि ट्रॅफिक जॅममध्ये आम्हाला पोहोचवण्यासाठी तयार होते. एक्स युजरने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करताच नेटीझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.