Dog Viral Video: चक्क कुत्रा करतोय सिक्युरीटी गार्डची ड्युटी; गेट उघडण्यापासून ते रजिस्टरमध्ये एन्ट्री करण्यापर्यंत चोख करतोय काम, पहा व्हिडिओ
वेळ पडल्यास आपल्या जीवावर उदार होऊनही तो आपल्या मालकाप्रती असलेले प्रेम, इमानदारी व्यक्त करतो. सोशल मीडियावर तुम्ही कुत्र्यांचे विविध व्हिडिओज पाहिले असतील.
कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी आहे. वेळ पडल्यास आपल्या जीवावर उदार होऊनही तो आपल्या मालकाप्रती असलेले प्रेम, इमानदारी व्यक्त करतो. सोशल मीडियावर तुम्ही कुत्र्यांचे विविध व्हिडिओज पाहिले असतील. त्यातील अनेक व्हिडिओजनी तुमचे मन जिंकले असले. पण सध्या कुत्रा एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कुत्रा सुरक्षा रक्षकाचे काम करताना दिसत आहे आणि हे काम तो अगदी चोख करत आहे. या व्हिडिओत तु्म्ही पाहू शकाल, एक कुत्रा गेटवर सुरक्षा रक्षकाचे जॅकेट घालून बसला आहे. गेटवर कार येताच तो उठतो आणि गेट उघडतो. तसंच रजिस्टरमध्ये एन्ट्री न केल्याने तो वाहनचालकावर भुंकतो आणि तोंडात रजिस्टर पकडून एन्ट्री करण्यासाठी वाहनचालकाकडे नेऊन देतो.
कुत्रा कधी सुरक्षा रक्षक म्हणून काम करु शकतो असा कधी आपण विचारही केला नसेल. परंतु, या व्हिडिओमुळे कुत्राचा हा पैलू लक्षात येतो. खरंतर कुत्र्यांना ट्रेनिंग दिल्यास ते काय काय करु शकतात, हे आपण यापूर्वी अनेक व्हिडिओज पाहिले असेल. ('या' मंदिराच्या बाहेर चक्क कुत्रा देतो भाविकांना आशीर्वाद; व्हिडिओ पाहून तुम्ही ही व्हाल आश्चर्यचकीत, Watch Video)
पहा व्हिडिओ:
कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 2 लाख 30 हजार हून अधिक लोकांनी पाहिला असून कमेंट्चा वर्षाव होत आहे. त्याद्वारे या कुत्र्याचे प्रचंड कौतुक केले जात आहे.