IPL Auction 2025 Live

Delhi Male-Female Fight Video: हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर फाडले, चिडलेल्या महिलेकडून परुषाला कॉलर पकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

त्याबद्दल तिने एक पोस्टर लावले होते. ते हटवल्यावरुन तिने एक पुरुषाची कॉलर पकडली आणि त्याच्याशी भांडण केले. या घटनेचा व्हिडिओ (Delhi Male-Female Fight Video) सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे.

Dog and woman | Representational image (Photo Credits: pxhere)

हरवलेल्या कुत्र्याचे सोसायटीमध्ये लावलेले पोस्टर फाडून हटविल्याबद्दल एका महिलेने पुरुषावर हल्ला केला आहे. ही घटना नोएडा येथील सेक्टर 75 मधील एम्स गोल्फ एव्हेन्यू सोसायटीत ( Golf Avenue Society in Noida ) घडली. येथील एका महिलेचा कुत्रा हरवला होता. त्याबद्दल तिने एक पोस्टर लावले होते. ते हटवल्यावरुन तिने एक पुरुषाची कॉलर पकडली आणि त्याच्याशी भांडण केले. या घटनेचा व्हिडिओ (Delhi Male-Female Fight Video) सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला पुरषाची कॉलर पकडते आणि त्याला विचारते की, एओए (अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन) सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का? चिडलेल्या आवस्थेत ती त्याचे केस ओढते आणि त्याला चापटी लावायला हात उगारतानाही दिसते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी महिलेचा कुत्रा बेपत्ता झाल्यानंतर तिने गृहसंकुलात लावलेल्या हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर्स काढण्यावरून हे भांडण सुरु झाले होते. सदर व्यक्तीने सोसायटीत दिवाळीपूर्वीचे रंगकाम सुरु झाल्याने हे पस्ट काढले होते.

ट्विट

पोस्टर हटवल्याचे कळताच महिलेने घटनास्थळी धाव घेतली आणि जाब विचारत थेट मारहाण करण्यासच सुरुवात केली. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आर्शी तर पीडित पुरुषाचे नाव नवीन अस आहे. पोलिसांनी सांगितले की नवीनने सेक्टर 113 पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून ते महिलेच्या वक्तव्यावर आणि व्हिडिओच्या आधारे कारवाई करतील.