Viral Video: मगरीच्या तावडीतून बचावलेल्या हरणाची बिबट्याकडून शिकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

त्यामुळे अनेकदा ते एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडतात. पण, निसर्गाचीच रचना अशी की, एक प्राणी दुसऱ्या पाण्याचे अन्न असतो. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला एक व्हिडिओ (Viral Video) याचीच साक्ष देतो.

Deer | (Photo Credit- Twitter)

'आगीतून फुपाट्यात' ही म्हण आपण ऐकलीच असेल. मानवासाठी लागू होणारी ही म्हण पृथ्वीवरील इतर कोणत्या जीवासाठी लागू होईलच असे नाही. मानव वगळता पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा निसर्ग नियमानेच वागतो. त्यामुळे अनेकदा ते एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडतात. पण, निसर्गाचीच रचना अशी की, एक प्राणी दुसऱ्या पाण्याचे अन्न असतो. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला एक व्हिडिओ (Viral Video) याचीच साक्ष देतो. जो एका हरणाचा आहे. जे हरणी मगरीच्या (Crocodile) तावडीतून सुटते पण बिबट्याची (Leopard) शिकार होते.

मगर हा सरपटणारा प्राणी असला तरी तो पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्य करु शकतो. म्हणजेच तो भूजलचर प्राणी आहे. तो जमीन आणि पाण्यात चपळाईने शिकार करण्यातही पटाईत आहे. त्यामुळे जंगलातले प्राणी शक्यतो मगरीला घाबरुनच असतात. असेच एक हरीण मगरीच्या तावडीत सापडते. हरणाचा एक पाय महरीने आपल्या जबड्यात पकडलेला असतो. तरीही हरीण कसे तरी हरणीच्या जबड्यातून पाय सोडवून घेण्यात यशस्वी होते. पण कदाचित त्याचे आयुष्यच संपत आले असावे. (हेही वाचा, Royal Bengal Tiger Viral Video: रॉयल बंगाल टायगरने पोहत ओलांडली ब्रह्मपुत्रा नदी; व्हिडिओ व्हायरल)

व्हिडिओत पाहायला मिळते की, मगरमिठीतून हे हरीण आपला पाय सोडवून घेते. जखमी अवस्थेत लंगड्या पायाने हरीण पुढे धावत असते. मगरीच्या मिठीतून सुटून अवघ्या काही सेकंदच झालेले असतात. इतक्या झाडामागे दबा धरुन बसलेला बिबट्या हरणावर झडप घालतो. अर्थातच बिबट्याने क्षणार्धात त्याचा फडशा पाडला असे हे सांगायलाच नको.

ट्विट

ट्विटरवर @natureisbruta1 नावाच्या वापरकर्त्याने हा व्हडिओ शेअर केलेला आहे. शेअर केल्यापासून, या थरारक घटनेला ट्विटरवर 80,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून ट्विटरवर वापरकर्त्याकडून प्रतिक्रियाही येत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, "बिच्चारे हरीण... अत्यंत दुर्दैवी घटना!" . दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे "पुढच्या वेळी बचावासाठी हरणाला शुभेच्छा," तिसऱ्याने म्हटले आहे की, हे खूप भयानक दिसत आहे.. पण थरार पाहून मला आश्चर्य वाटते.