IPL Auction 2025 Live

IPL 2020: CSK गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी याच्या अपघाताची बातमी व्हायरल, जाणून घ्या संपूर्ण सत्य काय आहे?

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चे गोलंदाजी प्रशिक्षक आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji )यांचे नाव ट्विटरवर ट्रेंड होत आहे. यादरम्यान, त्याच्या अपघाताबद्दल बॉलिवूड इनसाइडर (Bollywood Insider) ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या अपघाताबद्दल ट्विट केले गेले, जे व्हायरल झाले आहे.

Photo Credit : Twitter

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चे गोलंदाजी प्रशिक्षक आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji )यांचे नाव ट्विटरवर ट्रेंड होत आहे. यादरम्यान, त्याच्या अपघाताबद्दल बॉलिवूड इनसाइडर (Bollywood Insider) ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या अपघाताबद्दल ट्विट केले गेले, जे व्हायरल झाले आहे.या ट्विटर अकाऊंटवर असे लिहिले होते की लक्ष्मीपती बालाजी एका अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांनी एक फोटोही शेअर केला असून ती कार लक्ष्मीपती बालाजीची असल्याचा दावा केला आहे.एका दुसऱ्या ट्वीट मध्ये 'RIP Lakshmipathy Balaji' असे ही लिहिले गेले आहे.जाणून घेऊयात नक्की काय खरे आहे.  

लक्ष्मीपती बालाजीच्या अपघाताची बातमी खोटी आहे. इंडिया कॉन्टेस्ट(@india4contests) या अकाउंटवर ट्विटरवर प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न होता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोणत्या गोलंदाजाने प्रथम हॅटट्रिक केली ?लक्ष्मीपती बालाजीने2008 मध्ये किंग्स इलेवन पंजाब ( Kings XI Punjab ) विरुद्ध इतिहासातील पहिली हॅटट्रिक घेतली. या प्रश्नाला उत्तर म्हणून अनेकांनी लक्ष्मीपती बालाजी यांचे नाव लिहिले आणि यामुळे लक्ष्मीपती बालाजी हा नाव ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात केली.आणि त्यामुळेच त्याच्या अपघाताची खोटी बातमी व्हायरल होऊ लागली.

बालाजी सध्या CSK टीमसह दुबईत आहेत. 10 ऑक्टोबर रोजी सीएसकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, ज्यात बालाजींनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. बालाजी म्हणाले होते की सगळीकडे एमएस धोनी… एमएस धोनी…होत आहे.पण तो ही एक माणूस आहे.CSK परभवानंतर सगळ्यांचे लक्ष धोनी कडे होते. बालाजी सध्या CSK टीमबरोबर बायो-बबलमध्ये आहेत. ट्विटर यूजर्सने देखील अशी मागणी करत आहेत की, ज्या ट्विटर हँडलने बालाजीच्या अपघाताची बातमी पसरविली आहे त्याला रिपोर्ट करायला पाहिजे.