COVID-19: गो कोरोना ते Coronavirus च्या भजनापर्यंत सोशल मीडिया वर व्हायरल होतायत हे भन्नाट व्हिडीओ; हसून हसून व्हाल हैराण
या जीवघेण्या संकटाच्या काळात सुद्धा हे व्हिडीओ काही क्षण पोटभरून हसायला लावतात आणि काही अंशी का होईना नेटकऱ्यांची चिंता दूर करतात. हेच व्हिडीओ आज आपण पाहणार आहोत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजे मागील काही काळात एका बलाढ्य शत्रूसारखा साऱ्यांच्या पुढ्यात येऊन ठाकला आहे. या व्हायरसच्या भीतीपायी घरातून बाहेर पडणेही अनेकांसाठी मुश्किल होऊन बसले आहे. जगभरात कित्येक देशात हजारो बळी घेऊन आता भारतात सुद्धा या व्हायरने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मात्र या कोरोना व्हायरसला न घाबरता भारतीयांनी तर त्यातही आपली क्रिएटिव्हिटी दाखवायला सुरुवात केलीय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना या क्रिएटिव्हिटीचे सुरुवातकर्ते म्हणता येईल, चिनी नागरिकांच्या सोबत मुंबईत कोरोनाच्या विरुद्ध गो कोरोनाच्या (Go Corona) घोषणा देत आठवले यांनी या ट्रेंड ला सुरुवात केली आणि हळू हळू आता कोरोनावर गाणी, कविता, भजन, भारूड, असे अनेक कलाविष्कार नागरिकांनी बनवले आहेत. या कोरोनावरील ट्रेंडिंग व्हिडीओजची सोशल मीडियात बरीच चर्चा आहे. या जीवघेण्या संकटाच्या काळात सुद्धा हे व्हिडीओ काही क्षण पोटभरून हसायला लावतात आणि काही अंशी का होईना नेटकऱ्यांची चिंता दूर करतात. हेच व्हिडीओ आज आपण पाहणार आहोत.
कोरोना भजन
कोरोनावरील व्हायरल गाणी
कोरोना टिकटॉक
या सर्व गाण्यांवर अनेकांनी टिकटॉक व्हिडीओ बनवले आहेत, तसेच सोशल मीडियाच्या अनेक पेजेस ना हे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत, यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी या व्हिडीओजना वाईट तर काहींनी चांगले म्हंटले आहे मात्र मत काही असलं तरी हे व्हिडीओ पहिले सर्वांनी आहेत. सोबतच कोरोनावरील अनेक मिम्स सुद्धा व्हायरल होत आहेत, किंबहुना हे मिम्स पाहूनच कोरोना भारतातून पळून जाईल असाही तर्क नेटकऱ्यांनी गमतीत लावला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तर कोरोना वरून काही चित्रपट निर्मात्यांनी सिनेमा काढण्याचे प्लॅन केल्याचे सुद्धा ऐकू येत होते. यासाठी कोरोना प्यार है हे एक नाव सुद्धा रजिस्टर करून घेण्यात आले होते. कोरोनाचा भारतात जनजीवनाला बसलेला फटका पाहता तरीही असे व्हिडीओज बनवून मूड लाईट करण्याचे काम करणे हेच स्पिरिट म्हणता येईल.