Chappal Thieves: दोन चप्पल चोरांना कोर्टाने ठोठावला 7 वर्षांचा कारावास आणि 41 हजार रुपये दंड, हरिणातील रेवडी जिल्ह्यातील घटना

हरियाणातील रेवडी येथे असाच काहीसा प्रकार घडला. कोर्टाने दोन चोरांना तब्बल 7 वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही गुन्हेगार हे चप्पल चोर आहेत. कोर्टाने दोन चोरांना तब्बल 7 वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही गुन्हेगार हे चप्पल चोर आहेत.

Chappal Thieves | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Imprisonment To Chappal Thieves: गुन्हा कोणताही असला तरी गुन्हेगार हा कायद्याच्या भाषेत गुन्हेगारच असतो. कायद्याच्या भाषेत त्याला वेगळ्या नजरेतून पाहता येत नाही. तसे, कोणतीही चोरी हा गुन्हाच असतो आणि ती वस्तू चोरणारा व्यक्ती गुन्हेगार. त्यामुळे वस्तू काहीही असली तरीसुद्धा चोर हा चोरच असतो. पण, चोरीमध्येही अनेक प्रकार आहेत, दरोडा, जबरी चोरी वगैरे वगैरे. पण, काही चोर मात्र अगदीच दळभद्री असतात. त्यांना भुरटे चोर असेही म्हणता येईल. हे भुरटे जेव्हा कायद्याच्या कक्षेत सापडतात तेव्हा त्यांना चांगलीच अद्दल घडते. हरियाणातील रेवडी येथे असाच काहीसा प्रकार घडला. कोर्टाने दोन चोरांना तब्बल 7 वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही गुन्हेगार हे चप्पल चोर आहेत.

आरोप आहे की, दोन चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत चप्पल दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानमालकाला धमकावत चपलांचे चार जोड घेऊन पोबारा केला. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि तपास सुरु ठेवला. दोन वर्षांनी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.चोरांवर खटला चालला त्यात ते दोषी आढळले. कोर्टाने त्यांना प्रत्येकी 41 हजार रुपये दंड आणि सात वर्षांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली. जर दंड भरला नाही तर सहा महिन्यांचा अधिक कारावास असे आदेश कोर्टाने दिले. (हेही वाचा, Shoe Theft in Indian Railways: रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीचे हरवलेले बूट शोधण्यासाठी चक्क GRP, RPF आणि IRCTC कामाला; महिन्याभरात लागला शोध)

घटना 2021 मध्ये घडली आहे. दुकानाचे मालक अशोक कुमार हे रेवाडी येथे असलेल्या त्याच्या दुकानात होते, तेव्हा काली आणि दीपक नावाचे दोन आरोपी मोटारसायकलवरुन आले. त्यांनी दुकानदाराला बंदुकीच्या धाक दाखवून लुटले. दुकानातील सुमारे आठ हजार रुपये किमतीच्या बुटांचे चार जोड पॅकिंग केले आणि पळ काढला. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने शनिवारी दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. सोमवारी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif