Coronavirus Vaccine Viral Video: कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची धरपकड, व्हिडिओ पाहून येईल हसू
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणात आणायचा तर सरकार सांगते त्याप्रमाणे लसीकरण Corona Vaccination) करणे किती महत्त्वाचे हे सर्वांनाच माहिती आहे. असे असले तरी काही नागरिक मात्र सरकारचे मानायला तयार नाहीत. कोरोना लसीकरण ही संकल्पनाच त्यांना इतकी घाबरवून टाकणारी आहे की, बोलायची सोय नाही.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणात आणायचा तर सरकार सांगते त्याप्रमाणे लसीकरण Corona Vaccination) करणे किती महत्त्वाचे हे सर्वांनाच माहिती आहे. असे असले तरी काही नागरिक मात्र सरकारचे मानायला तयार नाहीत. कोरोना लसीकरण ही संकल्पनाच त्यांना इतकी घाबरवून टाकणारी आहे की, बोलायची सोय नाही. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Vaccination Viral Video) होत आहे. ज्यात काही अधिकारी एका नागरिकाला कोरोना लसीकरणासाठी पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. हा व्हिडिओ (Trending Video) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील असल्याचा दावा केला जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
व्हायरस व्हिडिओत पाहायला मिळते की, आरोग्य विभागाचे एक पथक नागरिकांना धरपकड करुन कोरोना लस देत आहे. एक नागरिक मात्र कोरोना लस घ्यायला घाबरत आहे. आरोग्य विभागाचे लोक त्या व्यक्तीला सांगतात की, 'तुला लस तर घ्यावीच लागेल.' यावर तो व्यक्ती म्हणतो की, 'मी लस नाही घेणार.' सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहून नेटीझन्सचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, खरोखरच हा एक विनोदी आणि तितकाच मजेशीर व्हिडिओ आहे. दुसरा एक युजर म्हणतो की, भावा... कृपा कर आणि कोरोना लस घे. (हेही वाचा, Fact Check: देशात 25 जानेवारीपर्यंत Lockdown जाहीर केल्याची Fake News व्हायरल; जाणून घ्या सत्य)
व्हिडिओ
बलिया में पटक के कोरोना से बचने का टीका लगाया जा रहा है- मुर्खता इसी को कहते हैं #UttarPradesh #vaccination pic.twitter.com/zCH30R8vB3
— Utkarsh Singh (@utkarshs88) January 19, 2022
कोरोना (Corona) काळ हा सर्वांसाठीच एक वाईट कालावधी ठरला. या काळात अवघी दुनिया लॉकडाऊनमध्ये अडकली. सामाजिक डिस्टन्स (Social Distance) ठेवता ठेवता समाजात मोठे अंतरही पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यानच्या काळात लसीकरण सुरु झाले आणि आता कुठे कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. मात्र त्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विषयातील जाणकार सांगतात.
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

