Fact Check: भारतामध्ये 1 डिसेंबर पासून पुन्हा वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना वायरस लॉकडाऊन? पहा या फेक न्यूज वर PIB ने केलेला खुलासा
त्यामुळे तुमच्याकडेही व्हॉट्सअॅपवर फॉर्वर्ड केलेल्या मेसेजेसमध्ये असा दावा असलेला मेसेज आला असेल तर तो पुढे पाठवू नका किंवा आंधळेपणाने त्यावर विश्वासदेखील ठेवू नका.
मोदी सरकार भारतामध्ये येत्या 1 डिसेंबर पासून पुन्हा देशभर कडक लॉकडाऊन करण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा आशयाचं ट्वीट सध्या सोशल मीडीयामध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान हा दावा एका प्रतिष्ठीत मीडिया हाऊसच्या नावाने केला जात असल्याने नागरिकांमध्येही खळबळ पसरली आहे. मात्र आज PIB ने त्यावर खुलासा करत देशात पुन्हा 1 डिसेंबरपासून लॉकडाऊन करण्याचा दावा खोटा असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्याकडेही व्हॉट्सअॅपवर फॉर्वर्ड केलेल्या मेसेजेसमध्ये असा दावा असलेला मेसेज आला असेल तर तो पुढे पाठवू नका किंवा आंधळेपणाने त्यावर विश्वासदेखील ठेवू नका. Fact Check: कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याची आवश्यकता नाही, WHO चा सल्ला? PIB ने केला व्हायरल मेसेज मागील खुलासा.
दरम्यान सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या दाव्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की,' भारतामध्ये वाढत्या कोविड 19 च्या रूग्णसंख्येमुळे आतापुन्हा 1 डिसेंबरपासून पूर्ण लॉकडाऊन केला जाईल. ' तर PIB या सरकारी वृत्तसंस्थेने यावर स्पष्टीकरण देताना, भारत सरकारने पुन्हा देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. असे म्हटले आहे. तसेच PIB Fact CHeck ने हे देखील स्पष्ट केले आहे की सोशल मीडीयात फिरणारे मेसेजेस हे मॉर्फ़ केलेले आहेत.
PIB Tweet
मार्च 2020 पासून भारतामध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या देशात केवळ कंटेन्मेंट झोनमध्येच कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश आहेत. इतरत्र सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सणासुदीच्या निमित्ताने सध्या पुन्हा नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत वाढती थंडी आणि अशी गर्दी यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येचा भडका उडण्याचीदेखील शक्यता आहे.